यु विन अँप चा वापर करा- डॉ सुवर्णा हुबेकर
गोंदिया । राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत सरकारी दवाखान्यात लहान बालकांचे मोफत लसीकरण केले जाते.
जन्मानंतर नवजात शिशुचे नियमितपणे लसीकरण करावे लागते . त्यासाठी बाळाचे लसीकरणाचे कार्ड
लसीकरणाची पुढील तारीख लक्षात ठेवावी लागते मात्र अनेकदा पालक लसीकरणाची तारीख विसरतात व मुलांना लस देणे राहून जाते.
मात्र आता केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे खास नियमित लसीकरण साठी यु विन अँप विकसित करण्यात आले आहे .कोरोना
प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन पोर्टल आणि कोविन अँप यशस्वी पणे वापरली होती त्याच धर्ती वर आता यु विन अँप चा वापर नियमित लसीकरण करताना केला जाणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा
हुबेकर यांनी दिली
येत्या 7 ऑगस्ट रोजी यु विन अँप एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र भर लाँच होत आहे त्या निमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी स्टाफ ला आवाहन केले की यु विन अँप चा वापर करा व लसीकरण मोहीम यशस्वी करा.
यू विन अँप चा वापर कसा करावा या बाबत नुकतेच राज्य स्तरीय व जिल्हा स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आरोग्य विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती यात वैद्यकीय अधिकारी परोमेडीकल स्टाफ व डेटा एन्ट्री ओपरेटर यांचे यु विन हँडलिंग बाबत गहन ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले .
या यु विन अँप बाबत माहिती देताना के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की हे कॉ विन च्या धर्ती वर विकसित केलेले अँप आहे यामध्ये आई किंवा वडील ,पालक यांचे ओळख पत्र व मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करण्यात येइल ही नोंदणी सुशिक्षित पालक स्वतः सुद्धा यु विन अँप वर करू शकतील लसीकरण केंद्रावर ही नोंदणी आशा वर्कर किंवा ऐ एन एम किंवा आरोग्य कर्मचारी करू शकतील लसीकरणाची नोंद यु विन अँप वर केली जाईल
लसीकरण सर्टिफिकेट डोउनलोड करून प्रिंट देखील करता येइल . आरोग्य कर्मचाऱयांना यु विन अँप वर लसीकरण सत्राचे नियोजन या सॉफ्टवेअर वर करता येइल नियोजित कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थी ची यादी आपोआप तयार होईल तसेच पात्र लाभार्थीना त्यांच्या मोबाइल वर संदेश जाईल व लसीकरण झाल्यावर लिंक संदेशा द्वारे त्याचे डिजिटल लसीकरण कार्ड डाउन लोड करता येइलं
त्यामुळे नियमित लसीकरनाचे 100 टक्के उद्दिष्ट्य साध्य करण्यास या यु विन सॉफ्टवेअरची मदतच होईल असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे .
यु विन सॉफ्टवेअर यशस्वी लौंचिंग साठी गोंदिया जिल्हा माता बाल संगोपन कक्ष शितसाखळी तज्ञा व डेटा मॅनेजर्स 7 ऑगस्ट साठी युद्ध पातळी वर
तयारी करीत असल्याची माहिती डॉ सुवर्णा हुबेकर यांनी दिली आहे.
No comments: