इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया ने सरकारच्या 'बाल विवाहमुक्त भारत' ला पाठिंबा जाहीर केला
गोंदिया । केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी 'बाल विवाहमुक्त भारत' मोहिम सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने बालविवाहाविरोधात रॅलींचे, शपथविधी समारंभांचे आयोजन केले*
*• कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रजीत नायर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी "जिल्हा बालविवाहमुक्त करणार" असा संकल्प केला*
*• इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया ही जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या 250 हून अधिक एनजीओ भागीदारांच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे*
*• गावावात बालविवाहाविरोधात रॅलींचे, कॅन्डेल मार्च, शपथविधी कार्यक्रम आयोजित*
विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे केंद्र सरकारने बालविवाह विरोधी 'बाल विवाहमुक्त भारत' मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सुद्धा जिल्ह्यात इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया च्या सहकार्याने रॅल्या, शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे प्रजीत नायर जिल्हाधिकारी गोंदिया हे समारंभात सामील झाले तसेच गोरख भामरे पोलीस अधिक्षक आणि उपस्थित मानसी पाटील उपजिल्हाधिकारी (सामान्य), भैयासाहेब बेहेरे, निवासी उपजिल्हाधिकारी, देवका खोब्रागडे अध्यक्ष बाल कल्याण समिती, मनोज राहागडाले सदस्य बाल कल्याण समिती, देवका खोब्रागडे बाल कल्याण समिती, वर्षा हलमारे बाल कल्याण समिती, गजानन गोबाडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अशोक बेलेकर संचालक इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक आय एस डब्ल्यु एस, विशाल मेश्राम चाइल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन, बाल न्याय मंडळ, पोलीस विभाग, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी चे कर्मचारी, सर्व विभागांचे कर्मचारी सर्वाना बालविवाह विरुद्ध शपथ दिली. जिल्हाभरात शेकडो ग्रामस्थ, ग्राम प्रमुख, बालविवाह संरक्षण अधिकारी(सीएमपीओ), आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि महिला यांनी शपथ घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला.

या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी, प्रजीत नायर, म्हणाले, बालविवाहाचे दुष्परिणाम दीर्घकाळापर्यंत कायम राहतात, असे सांगून हि कुप्रथा समूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. गोंदिया जिल्हावासीयांना आवाहन करतो कि बालविवाहाला नाही म्हणू व शिक्षणाला होय म्हणू. बालविवाहामुळे मुलींचे बालपण त्यांचे आरोग्य, शिक्षण हिरावून घेतले जाते हे भविष्यासाठी घातक आहे. याकरिता तुमच्या आजूबाजूला, समाजामध्ये व घरामध्ये होत असलेल्या घटना प्रशाशाना च्या लक्षात आणून देणे व अश्या घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवणे हे सर्वांची जबाबदारी आहे .
या देशव्यापी मोहिमेबद्दल आणि त्यामुळे वास्तविक स्वरूपात त्यांचे काम लवकर कसे होईल, याविषयी बोलताना इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी चे संचालक म्हणाले, "बालविवाहांबाबत जनजागृती करण्यासाठी, असे कोणतेही विवाह रोखण्यासाठी आम्ही सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रमुख यांच्यासमवेत जिल्ह्यात काम करीत आहोत आणि त्यासोबतच सरकारच्या या मोहिमेमुळे या लढ्याला नवी ऊर्जा आणि पाठबळ लाभणार आहे. अखेर बालविवाह संपुष्टात आल्याने इतकी वर्षे आम्ही ज्या लढाईत होतो ती संपण्याच्या मार्गावर आहे आणि हे पाहणे आम्हाला अत्यंत समाधान देऊन जाणारा क्षण आहे. बालविवाहाच्या गुन्ह्यापुढे भारत गप्प बसणार नाही आणि प्रत्येक मुलाला हक्काचे बालपण मिळावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे."
No comments: