केटीएस मध्ये न्यूमोनिया प्रतिबंध जनजागृती सप्ताह
गोंदिया । महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 16 नोव्हेंबर ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान न्युमोनिया
जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे
त्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या नेतृत्वाखाली एका
जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानात मार्गदर्शक म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी जयस्वाल के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर डॉ प्रदीप आनंद डॉ अनिल आटे तसेच पी एच एन नर्सिंग ऑफिसर श्रीमती निलू चुटे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
नुमोनिया प्रतिबंध अभियान बाबत माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे म्हणाले लहान मुलांना बदलत्या वातावरणात उबदार ठेवावे, वैयक्तिक स्वच्छता ठेवावी सर्दी खासी कडे दुर्लक्ष करू नये गोंदिया जिल्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात न्युमोनिया वर मोफत ऑषोधोपचार उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा या वेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या की संपुर्ण महाराष्ट्र मध्ये सांस हा न्युमोनिया प्रतिबंध सप्ताह कार्यक्रम म्हणून राबविण्यात येत आहे
नुमोनिया नही तर बचपन सही या उक्ती प्रमाणे आपल्या बालकांचा या थंडीत
न्यूमोनिया पासून बचाव करण्याचा संकल्प आज घेण्यात आला आहे
या प्रसंगी उपस्थित अर्बन विभागातील आशा वर्कर यांना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी जयसवाल यांनी
नुमोनिया कसा ओळखावा व आजारी नवजात शिशु ला संदर्भ सेवा देऊन बाल रुग्णालयात
रेफेर कधी करावे या बाबत सविस्तर माहिती दिली
के टी एस च्या पी एच एन नर्सिंग ऑफिसर यांनी बाळ आजारी असताना त्याचा आहार विहार कसा असावा या बाबत सविस्तर माहिती सांगितली
या प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी जैस्वाल यांच्या हस्ते सांस या न्यूमोनिया प्रतिबंध कार्यक्रम ची माहितीपत्रिका प्रकाशित करण्यात आली
या कार्यक्रमाचे संचालन पी एच एन शालिनी कोरेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन नर्सिंग ऑफिसर रुपाली टोने यांनी व्यक्त केले .
No comments: