Breaking

२४ वर्ष देशसेवा करुन निवृत्त होऊन आलेल्या राजेश पुंडे यांचे रेखलाल टेंभरे यांनी केले अभिनंदन

गोरेगांव- दि. ३ मे ला राजेश रुपलालजी पुंडे मु.पाटीलटोला / कन्हारपायली ता.सडक/अर्जुनी यांनी भारतीय सैन्यदलातुन निवृत्ती घेतली. त्याप्रसंगी रेखलाल टेंभरे मित्रपरिवार व भारतिय किसान संघ यांच्याकडुन त्यांचे सत्कार संमारंभ गोरेगांव येथिल गणेश कृषि केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणुन रेखलाल टेंभरे डायरेक्टर (को-ऑप. बँक गोंदिया),  प्रमुख अतिथी – श्री राजेश राणे (अध्यक्ष भारतीय किसान संघ  विदर्भ प्रांत), डॉ.मंगल बिसेन (अध्यक्ष भारतीय किसान संघ गोंदिया जिल्हा), नुतन येळे (मंत्री भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत), मुन्नालाल बघेले (उपाध्यक्ष भारतीय किसान संघ गोंदिया जिल्हा), पुनेश बेापचे (अध्यक्ष भारतीय किसान संघ गोरेगांव तालुका), चंद्रकांत पारधी (मंत्री भारतीय किसान संघ गोरेगांव तालुका), सुखदेव रहांगडाले (विद़युत विभाग गोंदिया), हरिचंद कटरे (संचालक माजी सैनीक पतसंस्था गोंदिया), किशोर ठाकरे (अध्यक्ष सेवा सहकारी संस्था)

  कार्यक्रमाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना रेखलाल टेंभरे म्हणाले की, प्रत्येक माणुस स्वत्:साठी जगतो. समाजात वावरतांना तसा अनुभव येतेा. पण देशसेवा व समाजसेवा करणारे लोक समाजात फार कमी असतात. कारण दुस-यासाठी जगण्यासाठी मोठा मण असणे आवश्यक असते. अशा लोकांचे समाजाने आभार व्यक्त करावे असे मार्गदर्शन टेंभरे यांनी दिले.

No comments:

Powered by Blogger.