Breaking

घरफोडी चोरी करण्यासाठी पोलीस करणार ग्रामरक्षक दलाची स्थापना

             तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायतीमध्ये संगणक साहित्य चोरी तसेच घरफोडी व मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने यावर आळा घालण्यासाठी ग्रामस्तरावर ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दृष्टीने ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला असून पोलीस पाटलाची सभा घेऊन तशा सूचना सुद्धा देण्यात आले आहेत.
ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात गस्त घालावी गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष देऊन चोरी होणार नाहीत. तसेच गावात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण राहील याची दक्षता घेणे अशी जबाबदारी सोपवली जाणार आहे. या ग्रामरक्षक सदस्यांना पोलीस विभागातर्फे ओळखपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्यात या दलाचे मूल्यमापन करून उत्तम कामगिरी करणाऱ्या दलाला प्रशस्तीपत्र व बक्षीस दिले जाणार असल्याचे अर्जुनी-मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव तोंडले यांनी सांगितले

No comments:

Powered by Blogger.