Breaking

अर्जुनी येथे "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती


                     दि. 3 जानेवारी 2020 ला जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा अर्जुनी येथे "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती"च्या प्रित्यर्थ "बालिका दिन" म्हणून साजरा करण्यात आला. सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
 कार्यक्रमाचे प्रास्तविक भाषण सौ. रंगारी मैडम (उ.श्रे.मु) ह्यांनी स्त्री शिक्षणाचे  महत्त्व सर्वांपुढे ठेवले.
 प्रमुख अतिथी- श्री. बडवाईक सर (कें.प्र.) यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरे द्वारे मार्गदर्शनाच्या एक उत्तम उदाहरण देऊन सावित्रीबाई फुले विषयी सखोल माहिती दिली.
 श्री. रहांगडाले सर (सेवानिवृत) यांनी विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. तसेच गीत गायन, ओव्या इत्यादी सादर केले..
 या दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले..
१) वादविवाद स्पर्धा
२) व्यंजन स्पर्धा
३) भाषण स्पर्धा
४) गीतगायन स्पर्धा
५) सावित्रीबाई फुले वेशभुषा स्पर्धा
६) लेक वाचवा लेक शिकवा
इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष- श्री. नरेंद्र गजभिये (शा.व्य.समिती अध्यक्ष) यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित खुप सुंदर माहिती दिली.
 कार्यक्रमाचे संचालन कु. साक्षी तुरकर वर्ग-६वा व आभार प्रदर्शन कु. तनिशा बिसेन वर्ग-६वा च्या विद्यार्थ्यांनी करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.