क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची अवमानना तुमसर येथील घटना
गोरेगाव : तालुक्यातील तुमसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याची अवमानना केल्याचा प्रकार आज (ता.११) सकाळी उघडकीस आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोरेगाव पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून अज्ञात समाजकंटकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सविस्तर असे की, तालुक्यातील तुमसर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा परिसरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा आहे. काल (ता.१०) दुपार पाळीच्या शाळेनंतर शाळेचा गेट बंद करण्यात आला होता. आज (ता.११) सकाळी सकाळपाळीसाठी विद्यार्थी शाळेत दाखल होताच सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या गळ्यात दारूची बॉटल व प्लास्टिकचे ग्लास गुंतलेली माळ दिसून आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी या अवमाननेचा प्रकार पालक व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यापूर्वी ती माळ सुज्ञतेचा परिचय देत काढून घेतली. यानंतर अवमाननेचा प्रकार शिक्षकांसमोर आणून दिला. यावरून गोरेगाव पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून अज्ञात समाजकंटकाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मद्यपी समाजकंटकांचे कृत्य
अज्ञात दारोड्यांनी शाळेच्या प्रांगणात जावून मद्य प्राशन केले. प्राशनानंतर विकृत मानसिकतेतून दारूचे बॉटल व वापरलेले प्लास्टिक ग्लास एका दोरीत गुंफून माळ तयार करून पुतळ्याची अवमानना केली. हे घटनास्थळावरून स्पष्ट अनुभवास आले. ते मद्यपी समाजकंटक कोण? असा सवाल उपस्थित करून गावात आरोपींचा शोध घेतला जात आहे.

No comments: