प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा जिल्ह्यात गोंधळ.
गोंदिया : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकर्यांना समृद्ध करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र हा आयोग अद्यापही लागू करण्यात आला नाही. या उलट शासनाच्या वतीने हमीभावात वाढ करून शेतकर्यांच्या सन्मानासाठी विविध योजना आणत आहेत. त्यातच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत मिळणार्या निधीपासूनही शेतकरी जिल्ह्यात वंचित राहत असल्याचे चित्र दिसून आले आहे. शेतकर्यांचे नाव आधारकार्ड वर दुसरे व सातबारावर दुसरे किंवा नाव न जुडने तसेच लिंक फेल यामुळे या योजनेचा जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे.शेती व्यवसाय करतांना शेतकर्यांना लागणारे बियाणे व त्यानंतर लागणारी रासायनिक खते किंवा इतर किरकोड खर्च तात्पुरत्या स्वरुपात भागविता यावा, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अस्तित्वात आणली. या योजनेंतर्गत वर्षभरात टप्प्या-टप्प्याने २००० असे एकूण तीन टप्प्यात ६ हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र जिल्ह्यात या योजनेचे लाभ घेणारे कमीच शेतकरी आहेत. या योजनेतही अनेक अडचणी निर्माण झाल्याने योजनेच्या सन्मानापासून शेतकरी वंचित राहत आहेत. या पूर्वीच्या राज्य शासनाने जाहिर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जसा गोंधळ उडाला, तसाच गोंधळ या योजनेतही उडत असल्याचे जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येवरून दिसून येत आहे. तेव्हा अटी व शर्तींची अट शिथील करत शेतकर्यांना कसा लाभ पोहचेल याकडे लक्ष केंद्रित करने आवश्यक झाले आहे.
गोंदियात २० हजार लाभार्थी वंचित
गोंदिया तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजने अंतर्गत अर्ज भरलेल्या लाभार्थीपैकी १७४४१ लाभार्थी शेतकरी यांचे नाव त्यांच्या आधार कार्ड वरील नावाप्रमाणे नसल्यामुळे त्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत असून अडचण निर्माण झाली आहे. आधार प्रमाणे नाव नसलेल्या यादीतील लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड ,बॅक पासबुक घेवून जवळच्या ग्राहक सुविधा केंद्रात, आपले सरकार केंद्रात किंवा ग्राम पंचायत मधिल ऑपरेटरकडे जाऊन आधार प्रमाणे नावात दुरूस्ती करून घ्यावी, असे तहसीलदारांच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. ही परिस्थिती एकट्या गोंदिया तालुक्याची नसून सर्वच तालुक्यात अशा प्रकारे या योजनेचा गोंधळ उडला आहे.

No comments: