ग्राहक पंचायतचा जिल्हा ग्राहक मेळावा उत्साहात
ग्राहकांच्या हितासाठी काम करणार्या ग्राहक पंचायत गोंदियाचा जिल्हास्तरीय ग्राहक मेळावा १७ जानेवारी रोजी शासकीय विर्शामगृहात उत्साहात पार पडला.मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सह भूषण रामटेके, उपजिल्हा पुरवठा अधिकारी एल. एम. फाळके, ग्राहक पंचायतचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, सचिव अरुण वाघमारे, सहसंघटक मेघा कुळकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल जोशी, विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ संघटक रेखा भोंगाडे, सचिव दिलीप चौधरी, सहसचिव प्रशांत लांजेवार, अश्विनी मेर्शाम, गोंदिया जिल्हाध्यक्ष दुर्गेश रहांगडाले, जिल्हा संघटक राजेश कनोजिया, जिल्हा सचिव आदेश शर्मा, महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम, संघटक शितल रहांगडाले, सचिव सीमा बैतुले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मार्ल्यापणाने करण्यात आली. यावेळी डॉ.भूषण रामटेके यांनी ग्राहक हितासाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. डॉ. विजय लाड यांनी, राज्यात ग्राहक हितासाठी राबविण्यात आलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच गोंदिया जिल्ह्यात घराघरात ग्राहक जनजागृती अभियान राबण्याचे आवाहन केले.
अनिल जोशी यांनी, विद्युत विभाग तसेच विना एमआरपी व कालबाह्य वस्तू खरेदी करताना घ्यावयाच्या दक्षतेबद्दल माहिती दिली. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. संचालन सीमा बैतुले यांनी केले तर आभार दिलीप चौधरी यांनी मानले. यावेळी उमा महाजन, सीमा डोये, क्षितीजा बापट, मिना पाथोडे, अँड. अर्चना नंदगळे, प्रिती पवार, वर्षा बडगुजर, कविता शर्मा आदी उपस्थित होते.
No comments: