Breaking

न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असला तरी हा मराठा समाजाच्या अपेक्षांचा प्रस्थापित राजकीय पक्षांनी केलेला खेळखंडोबाच आहे! : रंगा राचुरे, अध्यक्ष, आप

गोंदिया । मराठा समाजाच्या रास्त अपेक्षा संविधानाच्या चौकटीत पूर्ण करण्याला आम आदमी पार्टीने या पूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. आज मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाज दुःखी आणि नाराज झालाय. अशा परिस्थितीत 'भाजपा - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्ये न करता, *सामाजिक सलोखा* कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे.'असे आवाहन राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केले आहे.

परंतु गेल्या काही वर्षात मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी फारशी पाऊले न उचलता या अपेक्षांना मतपेटीसाठी बांधून ठेवण्याचाच राष्ट्रवादी, काँग्रेस सह भाजप शिवसेना यांचा प्रयत्न होता. त्यामुळे *शिक्षण क्षेत्रातील आणि रोजगाराच्या क्षेत्रातील संधी कमी होत असतानाही दुसरीकडे खाजगीकरणाला प्रोत्साहन देत ह्या संधी साठीच्या लढाईत विविध जात समूहांना गुंतवून ठेवण्याचे काम केंद्रातील व राज्यातील सरकारांनी केले आहे*. या सर्व काळात विविध समाज गटातील असंतोष वाढला आहे. 

संविधानिक मार्गांचा वापर करत रास्त आरक्षण मिळवण्याचे सर्व प्रामाणिक प्रयत्न राज्य व केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे. मराठा समूहाने आता अधिक सजग राहण्याची गरज आहे. 

त्याच वेळेस अपेक्षित संधी वाढाव्यात म्हणून रोजगाराच्या खाजगीसह विविध क्षेत्रात सामाजिक न्यायाच्या भूमिकेची शक्यता पडताळून पहावी लागेल* असे रंगा राचुरे यांनी म्हंटले आहे. आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये अवलंबत असलेले 'सर्वांना शिक्षण, आरोग्य, रोजगार' असे कल्याणकारी धोरणच महाराष्ट्रातील मराठासमाजासह सर्वच जनतेच्या रास्त अपेक्षांची पूर्तता करू शकते असा आम आदमी पार्टीचा विश्वास आहे.

No comments:

Powered by Blogger.