Breaking

एड्स मुक्त गोंदिया चा संकल्प घ्या प्राचार्य बाहेकर

गोंदिया । महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व जि इ इस सोसायटी द्वारा संचालित गर्ल्स कॉलेज तर्फे जागतिक युवा दिन निमित्य एच आई वी व  एड्स प्रतिबंधक जनजागृती पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती

या स्पर्धेचे उदघाटन केटीएस सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते करण्यात आले अध्यक्ष स्थानी गर्ल्स कॉलेज चे  प्राचार्य डॉ बाहेकर सर होते
मार्गदर्शक म्हणून गोंदिया जिल्हा एड्स नियंत्रण पथक चे जिल्हा  समनव्यक श्री संजय जेणेकर होते रेड रिबन क्लब च्या समुद्देशिका श्रीमती अपर्णा जाधव  समुपदेशक श्री इंदूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या विदेर्भ विभागाच्या एन एस एस च्या विध्यापीठ प्रमुख डॉ कविता राजा भोज मॅडम परीक्षक म्हणून प्रामुख्याने उपस्तिथ होत्या
    12 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट स्वामी विवेकांनंद यांची जयंती म्हणून दर वर्षी जागतिक युवा पधरवाडा साजरा करण्यात येतो त्या निमित्य महाराष्ट्र राज्य एड्स
नियंत्रण सोसायटी तर्फे युवा मध्ये एड्स बाबत व्यापक जनजागृती होण्याकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात
     त्या अनुषंगाने रेड रिबन क्लब तर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते या प्रसंगी  मार्ग दर्शन करताना केटीएस च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की युवक युवतींनी उत्स्फूर्त पने  आपली एड्स तपासणी करून घ्यावी प्रतिबंध हाच एक उपाय आहे  दूषित सुया
दूषित रक्त व असुरक्षित शरीर संबंध यातून एड्स पसरतो
भारतात एड्स ला बळी पडणाऱ्या मध्ये युवा वर्गाचे प्रमाण जास्त आहे तेव्हा काळजी घ्या . संयम पाळा एड्स टाळा हा संदेश दिला
    गर्ल्स कॉलेज चे प्राचार्य डॉ एन के बाहेकर सर यांनी उपस्तिथ विद्यर्थिनी ना आवाहन केले की राष्टीय सेवा योजनेच्या विद्यर्थिनी नि समाजात आरोग्य बाबत व्यापक जनजागृती केली पाहिजे स्व नसेवक म्हणून चांगली भूमिका निभावली पाहिजे जागतिक युवा दिन च्या पर्वा वर आपण सर्व एड्समुक्त गोंदिया चा संकल्प करू  या  असे आवाहन केले
   या प्रसंगी श्री संजय जेणे कर व अपर्णा जाधव यांनी सुद्धा आरोग्य विषयक माहिती आणून प्रबोधन केले
पोस्टर स्पर्धेच्या विजेत्या प्रथम 3 विद्यर्थिनींना प्रमाणपत्र ट्रॉफी व रोख बक्षीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते देऊन सहभाग नोंदविणार्या मुलींना सुद्धा प्रमाणपत्र प्रमुख अतिथी च्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले

No comments:

Powered by Blogger.