येता कण कण तापाची करा तपासणी रक्ताची: डॉ सुवर्णा हुबेकर
गोंदिया । राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा आरोग्य प्रशासन तर्फे गोंदिया शहरात सिविल लाईन परिसरात मोफत आर डी के कॅम्प व डेंगू मलेरिया जनजागृती कॅम्प आयोजित करण्यात आला होता
या कॅम्प चे उदघाटन केटीएस च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी केले मार्गदर्शक म्हणून डीएम ओ ऑफिस चे श्री पंकज गजभिये प्रयोग शाळा तंत्रदय श्री लिलहारे व आई इ सी समुदेशक नितु फुले उपस्तीत होत्या
या वेळी केटीएस च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी गोंदिया शहरातील नागरिक यांना आवाहन केले की कुठलाही ताप अंगावर घेऊ नका साधी तापाची कन कण जरी वाटली तरी मोफत रक्त तपासणी करून घ्या कारण तापचे लवकर निदान झाले तर पेशंट गुंतागुंत पर्यंत जाणार नाही व तापजन्य आजाराने नाहक कुणी बळी पडणार नाही
आपला परिसर स्वछता ठेवा वॉर्ड निहाय स्वएन्सवक टीम तयार ठेवा आपले आरोग्य आपल्या हाती आहे
कृत्रिम मछर पैदास केंद्रे नष्ट करा अडगळीचे समान बाहेर काढा आणि आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळा त्यामुळे आपल्या नागरी वस्त्यातून डेंगू चा फैलाव होणार नाही
या वेळी नागरिक याना डेंगू व मलेरिया बाबत शास्त्रीय माहिती असलेल्या माहिती पत्रिका मलेरिया ऑफिस तर्फे श्री गजभिये यांनी वाटल्या.
राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक वॉर्डात वॉर्डातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे
No comments: