मुंडीपार येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले.
गोरेगांव:-गोरेगांव तालुक्यातील ग्राम *मुंडीपार* येथे अभिनव नाट्य कला मंडळाच्या वतीने दिनांक:- 29/11/2023 रोज बुधवारला तीन अंकी नाट्यप्रयोग *सजना मी डाव जिंकला* या महान सामाजिक पारिवारिक ग्रामीण जिवनावर आधारित,विनोदाने बहरलेल्या, नाटकाचे राधाकृष्ण मंदिर बाजार चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुसज्य रंगमंचकावर आयोजन करण्यात आले होते.गेल्या कित्येक वर्षापासून खास नाट्यरसिकांच्या आग्रहास्तव, कार्तीक पौर्णिमेच्या शुभपर्वावर मंडई निम्मित सातत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच लोकवर्गणीतून *ग्राम मुंडीपार* येथे मोफत नाटकाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सामाजिक न्यायमंत्री मा.इंजी.राजकुमारजी बडोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मा. डॅा.लक्ष्मणजी भगत,
कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरपंचायत गोरेगांव मा.आशिषजी बारेवार,
*रंगमंचपुजक* सभापती पंचायत समिती गोरेगांव मा.इंजी.मनोजभाऊ बोपचे,जिल्हा परिषद सदस्य मा.ससेंद्रजी भगत,पंचायत समिती सदस्य मा.शितलताई बिसेन,सेवानिवृत मुख्याध्यापक मा.एच.सी.भोयर सर,
दीपप्रज्वलन* पं.स.सदस्य व गटनेता रामेश्वरजी महारवाडे,माजी सरपंच मोहाडी मा.रजनीताई धपाडे, अध्यक्ष जैव विविधता मा.ममताताई खांडवाये,अध्यक्ष क्षत्रिय पोवार समाज संघटना मा.भुरनलालजी राहांगडाले,सेवानिवृत राऊंड ऑफिसर मा.संतोषजी पांडे,
सरपंच मा.प्रेमलताताई राऊत,
उपसरपंच मा. बि.जी.कटरे सर,
माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रामपंचायत सदस्य मा.जावेद(राजाभाई) खान,
सामाजिक कार्यकर्ता तेढा मा. काशीनाथजी भेंडारकर,पोलीस पाटील मा. विलासजी सिंदीमेश्राम,तंटामुक्ती अध्यक्ष मा.शंकरभाऊ बिसेन,
ग्रामसेवक मा.चंद्रशेखरजी वैद्य,
मा.सर्व ग्रामपंचायत सदस्य मुंडीपार
व इतर प्रमुख पाहुणे उपस्थितीत होते.
सदर नाटकाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नाट्यरसिक प्रेक्षक उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनव नाट्यकला मंडळाचे अध्यक्ष सुमेंद्र धमगाये यांनी केले तर संचालन रोहित पांडे व आभारप्रदर्शन उमेंद्र ठाकुर यांनी मानले.
No comments: