लोकसहभागातूनच एड्स नियंत्रण - जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
गोंदिया -एड्स हा एक जीवघेणा आजार आहे ज्यासाठी प्रतिबंध हाच एकमेव इलाज आहे. एड्स प्रतिबंधासाठी जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.एड्स हा एक धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होतो. या विषाणूच्या स्वरूपामुळे, या आजारावर कोणताही इलाज नाही, त्यामुळे एड्सपासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे.आणि लोकसहभागातूनच एड्स या भयंकर आजारावर नियंत्रण मिळू शकते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी शासकीय के.टि.एस जिल्हा रुग्णालय येथे एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसाइटी, मुंबई व शासकीय के.टि.एस सामान्य रुग्णालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे होते.तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन कापसे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तुरकर,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी जयस्वाल
वैद्यकीय अधिकारी
डॉ सुवर्णा हुबेकर,जिल्हा एड्स नियंत्रण पर्यवेक्षक संजय जेणेकर
सार्वजनिक आरोग्य परिचारिका निलु चुटे,
एआर टी सेन्टर च्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्मिता गेडाम,एन.एम.डी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.
डॉ. बबन मेश्राम , गर्ल्स महाविद्यालय चे रासेयो कार्यक्रम अधिकारी
डॉ कविता राजभोज उपस्थित होते.
सकाळी 9वा शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक, नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी यांच्या भव्य एड्स जनजागृति रैलीस जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी हिरवी झंडी दाखवून सुरवात केली.
जागतिक एड्स नियंत्रण जनजागरण कार्यक्रमात प्रास्ताविक करतांना डॉ.सुर्वर्णा हुबेकर यांनी सांगितले की,एचआयव्ही एड्स बाबत एक प्रकारची धास्ती मनात घर करून जाते. या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असली तरी या जीवघेण्या आजाराने जगभरात आपले पाय पसरले आहे एड्स बाबत समाजातील कलंकित भावना नष्ट करण्यासाठी व बाधित रुग्णाचे मानवी हक्क अबाधित ठेविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, आयसीटिसी विभागाच्या नोंदीनुसार गोंदिया जिल्ह्यातही या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या बऱ्यापैकी असून मागील २० वर्षात जिल्ह्यात ३ हजाराच्या वर एड्स या आजाराने ग्रस्त असलेल्यांची नोंद आहे. सद्यास्थिती जिल्ह्यात १८५२ एड्स आजाराने पीडित उपचार घेत आहेत. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या आजारबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.
यावेळी एम.जे पॅरामेडिकल च्या विद्यार्थीयांनी पथनाट्याचे सादरीकरण केले.
तसेच मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे यांनी सांगितले की,गोंदिया जिल्ह्यातही या दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग व आयसीटीसी केंद्राच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. यंदाही १ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एड्स या आजाराने ग्रस्त असलेल्यांचा आढावा घेतला असता २००२ या वर्षीपासून जिल्ह्यात एड्स तपासणीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ३ हजार ७६ एड्स ग्रस्तांची नोंद केली आहे. आजघडीला जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ ग्रामीण रुग्णालय २ शासकीय जिल्हा रुग्णालय व खासगी असे ५८ तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले असून २०१० यावर्षीपासून जिल्ह्यात एआरटी उपचार सुरू झाले आहे. दरम्यान, १८५२ पीडित हा उपचार घेत आहेत. एड्स आजाराबाबत अनेक जन अद्यापही अनभिज्ञ आहे. त्यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे.
तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी एड्स दिना'निमित्त समाजात सर्व वयोगटातील लोकांना एचआयव्ही संसर्गाबाबत जागरुक केलं जातं. याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना 'जागतिक एड्स दिना'निमित्त एक थीम सेट करते, यामध्ये यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं 'जागतिक एड्स दिना'ची थीम 'Let Communities Lead' ठरवली आहे. 'जागतिक एड्स दिन' दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एड्स बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. जेणेकरुन WHO नुसार या थीमचा उद्देश पूर्ण होऊ शकेल.'जागतिक एड्स दिन' का साजरा केला जातो? : 'जागतिक एड्स दिना'चं उद्दिष्ट एचआयव्ही / एड्सबद्दल जागरुकता पसरवणं आणि जगभरातील या आजारानं बाधित लोकांना मदत करणं हा आहे. एड्सनं बाधित लोकांना समाजात कलंक आणि भेदभाव न करता सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता यावं, हा या दिवसाचा उद्देश आहे. त्यांच्यावरील अस्पृश्यतेचा भेदभाव संपवला पाहिजे. नवीन औषधांसह उपचारातील सुधारणांना पाठिंबा देणं आणि HIV/AIDS मुळे बाधित सर्व लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध आहेत, याची खात्री करणं हे देखील या दिवसाचं उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमांचे संचलन व आभार संजय जेणेकर यांनी केले.यशस्वीतेकरीता एन.एम .डी व एस.एस.गर्ल्स महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक,डि.बी सांयन्स महाविद्यालय रेड रिबन क्लब ,एन.जी.ओ चे पदाधिकारी, शासकीय परिचर्या स्कूल च्या विद्यार्थी, कर्मचारी तसेच के.टि.एस रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सहयोग केले.शेवटी एड्स दिनानिमित्त शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले.
No comments: