Breaking

गोंदियातील 30 विद्यार्थ्यांनी घेतले जैविक शेती अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण 
नागपूरच्या सेंद्रीय जैविक शेती केंद्राच्या पुढाकाराने रुची एग्रो फार्ममध्ये झाले प्रशिक्षण

दि.10:-धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी यासाठी पहिल्यांदाच येथील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय जैविक शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली.भारत सरकारच्या सेंद्रिय जैविक शेती केंद्र नागपूरच्या माध्यमातून हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.यासाठी धोटे बंधु महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अंजन नायडू यांनी जिवशास्त्र या विभागाच्या सहकार्याने सेंद्रीय जैविक शेती केंद्र नागपूरचे मुख्य संचालक डी कुमार व वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ.पांडे यांच्या पुढाकाराने गोंदियातील रुची अग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर यांचे शेत विद्यार्थ्यांच्या जैविक शेतीवरील प्रात्यक्षिक कार्यशाळेसाठी निवडले गेले.दरम्यान या 30 दिवसीय अभ्यासक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी एचडीएफशी बँकेचे विदर्भ झोन प्रमुख वगिशकुमार,एचएडीएफसी बँक कृषी कल्स्टर विभागाचे प्रमुख प्रज्वल गडलींग,रुची गृपचे संचालक महेंद्र ठाकुर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना एचडीएफसी बँक कृषी विभागाचे प्रज्वल गडलींग म्हणाले की आपल्या भागातील शेतीतून जैविकपध्दतीने पिकाचे उत्पादन घेत व्यवसाय केले तर इतरांनाही रोजगार मिळेल.परंतु  शिक्षित वर्ग हा बहुतांश शेतीकडे वळत नाही. परंतु ठाकूरबंधूनी जैविक शेतीच्या क्षेत्रात केलेले काम उल्लेखनिय असून जिल्ह्यात पहिल्यांदा अशाप्रकारे अभ्यासक्रम सुरू केले गेले आहे. तेथील युवकांना प्रशिक्षण मिळल्यानंतर ते ट्रेनर म्हणून देशात कुठेही काम करु शकतात.सध्या रासायनीक खतामुळे जमिनीची पोत नष्ट झाली आहे.सोबतच वातावरणात बदल झाले. त्यातच अन्नधान्यातही रसायन आल्याने शरीराला घातक झाल्याने मनुष्य कमजोर होत चालला आहे.त्यासाठी जैविक शेती काळाची गरज म्हणून निर्माण झाल्याचे म्हणाले.

यावेळी एचडीएफसी बँकेचे विदर्भ प्रमुख वाघील म्हणाले की,युरीयाच्या वापरामुळे उत्पादन वाढले, मात्र जमिनीची पोत कमी होत चालली.जैविक शेती काळाची गरज का झाले हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रात्यक्षिक करायची वेळ आली असून येथे नवनवीन प्रकार शिकायला मिळणार आहेत.शेतकर्याला समजावून सांगावे लागेल,त्याला सर्व पध्दती सांगाव्या लागतील. रासायनिक खतांचा व औषधांच्या वापरामूळे शेतीतून कॅन्सरसारखे रोग निर्माण होऊ लागल्याचेही ते म्हणाले.रुची एग्रो फार्मचे संचालक महेंद्र ठाकूर यांनी जैविक शेतीबद्दल तसेच आपण या क्षेत्राकडे कसे वळलो याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.


भारत सरकार यांच्या माध्यमातून हा कोर्स सुरू करण्यात आला. यात प्रशिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांसाठी येथील रुची फार्मचे प्रयोगशील शेतकरी महेंद्र ठाकूर यांच्या शेतात कार्यशाळा घेण्यात आली.ठाकूर यांच्या सेंद्रिय शेतीच्या मालाला देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी  भारत सरकारच्या नागपूर जैविक शेती केंद्रांने रुची फार्मची निवड केली. यावेळी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी करायची, जैविक खते कशाप्रकारे तयार करायची इ. माहिती देण्यात आली. आजच्या युगात विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी तिकडे वळत असल्याचे दिसतात. मात्र, शेतीकडे आज कोणीही पाहत नाही. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे.याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाची सुरूवात केली आहे. ३० दिवसीय हा जैविक शेती अभ्यासक्रम असून अभ्यासक्रम पुर्ण करणार्या विद्यार्थ्यांला प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थींना गावागावात जाऊन सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत त्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे लागणार आहे.

No comments:

Powered by Blogger.