Breaking

कोरोना अपडेट गोंदिया-भंडारा : गोंदिया व तिरोडा आणि भंडारा व तुमसर तालुक्यात बाधित मिळणे सुरूच

गोंदिया/भंडारा : दोन्ही जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधित मिळण्याची संख्या रोडावली आहे. तरी दोन्ही जिल्ह्यातून प्रत्येकी दोन तालुक्यात कोरोना रुग्ण आढळणे सुरूच आहे. आज गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया व तिरोडा आणि भंडारा जिल्ह्यातून भंडारा व तुमसर या तालुक्यात बाधित रुग्ण आढळणे सुरूच आहे.

जिल्ह्यात सोमवार, 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालनुसार 8 नवे रुग्ण आढळले आहेत. आज उपचारातून 0 रुग्ण बरे झाले आहे. तसेच आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात 90 क्रियाशील रुग्ण आहेत.

जिल्ह्यात केवळ गोंदिया तालुक्यात 5 व तिरोडा तालुक्यात 3 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. उर्वरित इतर तालुक्यात आज कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच जिल्ह्यात आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 0 आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 14,260 रुग्ण आढळले असून 13987 रुग्ण औषधोपचारातून बरे झाले आहेत. क्रियाशील रुग्ण 90 असून होम क्वोरंटाईन 47 आहेत. तर 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12880 झाली असून आज 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13318 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 टक्के आहे.

आज 202 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 21 हजार 194 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13318 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 09, मोहाडी 00, तुमसर 02, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 12880 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13318 झाली असून 114 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 324 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.43 टक्के एवढा आहे.

आजचे मुख्य बिंदू

आज 24 रुग्णांना डिस्चार्ज

11 कोरोना पॉझिटिव्ह

बरे झालेले रुग्ण 12880

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 13318

क्रियाशील रुग्ण 114

आज 00 मृत्यू

एकूण मृत्यू 324

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71 टक्के

No comments:

Powered by Blogger.