संकट उत्तराखंडावर : 170 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता, तपोवन टणलमधून 16 जणांना काढले
चमोलीत ग्लेशियर तुटल्याने ऋषीगंगा व धौलीगंगा नद्यांना महापूर
उत्तराखंडात रविवार, 7 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मोठे संकट कोसळले. राज्यातील चमोली जिल्ह्याच्या तपोवनात ग्लेशियर तुटून ऋषीगंगा नदीत पडला. त्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली. तसेच धौलीगंगावर बनत असलेला बांध वाहून गेला. तपोवनात एक खासगी पॉवर कंपनीचा ऋषीगंगा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आणि शासकीय कंपनी एनटीपीसीच्या प्रोजेक्टवर काम सुरूयाहे. या आपत्तीमध्ये येथेच सर्वाधिक नुकसान झाले.ऋषीगंगा प्रोजेक्टमध्ये काम करीत असलेले 15 ते 20 मजूर बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एनटीपीसी प्रोजेक्टवर जवळपास 150 मजुरांची जीवित हानीची शक्यता वर्तविली जात आहे. प्रोजेक्ट साईटमध्ये 3 मृतदेह मिळाले आहेत. दरम्यान घटनास्थळी रेस्क्यूसाठी पोहचलेली आयटीबीपीच्या चमूने तपोवन प्रोजेक्टजवळ टणलमध्ये अडकलेल्या सर्व 16 जणांना बाहेर काढले आहे.पपल कोटी ते चमोली दरम्यान अलकनंदा नदीचे जलस्तर वाढले आहे. परंतु नदीच्या क्षेत्राची रुंदी अधिक असल्याने प्रवाह सामान्य झाला आहे, ही थोडी दिलासा देणारी बाब आहे. घटनेच्या नंतर एनडीआरएफ व एडीआयआरएफच्या चमू घटनास्थळी पोहचून बचावकार्य करीत आहेत. उत्तराखंडाचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावट यांनी मृतकांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. मृत लोकांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंडातूनही 2 लाख रुपये देण्यात येतील. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.ग्लेशियर तुटल्याने धौलीनदीने विक्राळ रूप धारण केले आहे. मार्गात येणारी प्रत्येक बाधा पाहता पाहताच नदीच्या प्रवाहाने पार करणे सुरू केले. ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्ट साईटपर्यन्त पोहचता पोहचता नदीने एवढे विक्राळ रूप धारण केले की संपूर्ण बांध वाहून गेले. घटना स्थळावरील सर्व मशीन्स व लोक त्यात फसले.यानंतर प्रशासनाने हरिद्वारपर्यन्त अलर्ट जाहीर केले. टिहरी बांध ते भागीरथीमध्ये पाण्याचा डिस्चार्ज बंद करण्यात आला. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावट मोक्यावर पोहचले आहेत व परिस्थिती नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहेत.घटनेच्या नंतर अलकनंदा व गंगेच्या काठावरील परिसरात दहशत पसरली आहे. ऋषिकेशमध्ये राफ्टिंग व नावांवर प्रतिबंध लावण्यात आले आहे. तसेच श्रीनगर हायड्रो पॉवर प्रोजेक्टचे बांध सुद्धा खाली करण्यात आले आहे. त्यामुळे मागून पाणी वाढल्यास बांधचे जलस्तर वाढणार नाही.ऋषीगंगा व धौलीगंगाचे जलस्तर वाढले. चमोलीच्या तपोवन परिसरात सकाळी 10.30 वाजता ग्लेशियर तुटून ऋषीगंगामध्ये पडले. त्यामुळे नदीचे जलस्तर वाढले. हीच नदी रैणी गावात जावून धौलीगंगाला मिळते. त्यामुळे तिचा जलस्तर सुद्धा वाढला. नदीच्या काठावरील घर वाहून गेले. त्यानंतर परिसरातील घरांना खाली करण्यात आले.ऋषीगंगा व एनटीपीसीचा प्रोजेक्ट नष्ट झाला. ऋषीगंगा नदीच्या काठावर असलेल्या रैणी गावात ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्ट येतो. हा प्रोजेक्ट पुर्णपणे ध्वस्त झाला आहे. येथील जवळपास 15-20 मजूर बेपत्ता आहेत. येथील जोशीमठ मलारिया हायवेवर बॉर्डर रोड ऑर्गनाइज़ेशनचा बनविलेला पूल सुद्धा तुटला. येथेच 6 गुराखी व त्यांची जनावरे पाण्यात वाहून गेले. येथे रेस्क्यू टीम पोहचली आहे. ऋषीगंगाचे पाणी धौलीगंगाला मिळते. तेथे सुद्धा जलस्तर वाढला आहे. पाणी एनटीपीसी प्रोजेक्टमध्ये घुसले आहे. त्यामुळे गावाला जोडणारे दोन झूला ब्रिज वाहून गेले. एनटीपीसी प्रोजेक्टमध्ये काम करणार्या जवळपास 150 मजुरांची जीवहानी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आतापर्यंत येथे 10 मृतदेह सापडले आहेत. एनटीपीसीच्या भुयारीतून 16 मजुरांना वाचविण्यात आले आहे. रेस्क्यू चमू सातत्याने ऑपरेशन चालवीत आहेत.
रेस्क्यूसाठी आर्मी व एयरफोर्स लागली आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी यांच्यासह आर्मीने सुद्धा 600 जवान चमोलीत पाठविले आहेत. याशिवाय वायुसेनेने एमआय-17 व ध्रुव यांच्यासह तीन हेलीकाफ्टर मिशनवर पाठविले आहेत. गरज पडल्यास आणखी एयरक्राफ्ट पाठविण्यात येतील, असे वायुसेनेचे म्हणणे आहे.
No comments: