आम्ही विश्व लेखिका” व “संविधान मैत्री संघ” तर्फे साहित्य लेखन प्रोत्साहन- सांस्कृतिक बौद्धीक जागृती उपक्रम”
गोंदिया:- महिलांना लिहिण्यासाठी नविन दिशा देताना. तळागाळातील संघर्ष करणाऱ्या महिलांना भेटुन त्यांच्या संघर्षाच्या कथा, कविता, लेख, ललित साहित्य लिहा. दबलेल्या, हजारो महिलांच्या, कथा, गाथा, आत्मकथा जन्मास येईल. साहित्यात नव्या जिवंत, अस्सल साहित्याची भर पडेल असे प्रतिपादन गोंडवाना दर्शन च्या रचयीता विद्यापीठीय जेष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यानी केले. “आम्ही विश्व लेखिका” व संविधान मैत्री संघ या संस्थेच्या संयुक्त वतीने एस.एस.ए.गर्ल्स म्युनिसिपल शाळेत आयोजित *”साहित्य लेखन प्रोत्साहन- सांस्कृतिक बौद्धीक जागृती उपक्रम”* या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी संस्कृती बद्द्ल बोलताना त्यांनी माहिती दिली की “आदिवासी संस्कृती ही विश्वातील अतिप्राचीन मातृपुजक आदर्श संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत “आली बेटी झाली बेटी, धनाची सापडली पेटी “असे गीत गावुन स्वागत करतात. तिला, अंगणातली सुगंधी वेल, गोड पाण्याचा झरा, सोन्याची मोहरं अशा सुंदर उपमा दिल्या जाते. मुलीला दुय्यम समजल्या जात नाही. स्वमर्जी ने जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. विधवेला दुसरं लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे. सोडचिठ्ठी घेता येते. नव-याच्या नावाचे, कुंकू, बांगड्या, जोडवे, मंगळसूत्र इ. सौभाग्य अलंकार नाही. सौभाग्यवती हा गोंडी डिक्शनरी मध्ये शब्दचं नाही. स्त्रीवाचक एकही शीवी नाही. विधवेला, पुजेत, लग्नात व इतर विधीत समाजात मानाचे स्थान आहे. आदिवासी संस्कृती मध्ये बलात्कार हा शब्द नाही. पापपुण्य , स्वर्ग, नरक हा शब्द नाही. पुर्वजांना स्वतःला गागरा,मात्रृपितृ शक्ती म्हणुन पुजतात. भारतात जेवढे शिवलिंग आहे. ते सर्व आदिवासींचे सल्ला गागरा, शंबुपेन ठाणा शक्ती सरळ आहे. व जेवढया देवता आहे. त्या सर्व आदिवासी समाजातील समाजसेवक, समाज माता आहेत. त्या़ची नावगाव, कथा, बदलुन , त्यांचे ही धर्मांतरण करुन पोट भरण्याचे साधन बनविलेल्याचे आपण पाहतोय.
नव-याच्या नावाचा एकही सण, ऊत्सव, उपवास व्रत नाही. समुहवादी स़स्कृती, निसर्ग पुजक ,पंचत्त्वाला महाशक्ती, बडादेव, फडापेन म्हणुन पुजतात. व मात्रुपुजेला अधिक महत्त्व देतात.”एवढी प्रगत आदिवासी संस्कृती आहे पण लोकांना त्याची खरी ओळख कुठे तरी आपसी मतलबापायी दाबून टाकली,
जागृती कार्यक्रमाच्या प्रारंभी “आम्ही विश्व लेखिका” संस्थेचे पदाधिकारी मार्गदर्शक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रा.सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धरती आबा बिरसा मुंडा या महामानवांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष प्रा. डॉ.दिशा माणिकराव गेडाम, उपाध्यक्ष डॉ सुवर्णा हुबेकर,सचिव प्रा.डॉ. कविता राजाभोज, कार्याध्यक्ष यशोधरा सोनवणे, कोषाध्यक्ष वंदना कटरे, संचालक-सदस्य पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले संविधान मैत्री संघ व महिला सशक्तीकरण संघ तर्फे माधुरी पाटील, मुख्या. उमाताई गजभिये, गौतमा चिचखेडे, समता सैनिक दल तर्फे कमांडर किरण वासनिक, जिजाऊ ब्रिगेडच्या सविता बेदरकर,एस.एस.ए.गर्ल्स मुन्सी.हायस्कुल च्या मुख्य. अनिता एच.जोशी, झेड.पी.आमगाव मुख्य. के.एल.पुसाम, आदिवासी संघटनेच्या हेमलता अहाके, इंदिरा चौधरी, आरती पारधी, मीरा गेडाम, बबिता सलामे ,लता मडावी, शितल कुंभारे, प्रमिला सिंद्रामे, वनिता मडावी प्रामुख्याने उपस्थीत होत्या. या जागृती उपक्रमाअंतर्गत महिला व विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून निबंध, काव्य सुमनांजली, वक्तृत्व कला, गोंडी नृत्य इत्यादी सांस्कृतिक बौद्धीक स्पर्धा घेण्यात आले. त्यात लीना पुसाम, प्रणाली मनोहर, पारूल कोटांगले, सोनम मरस्कोल्हे, निलम नेवारे, स्नेहा मेश्राम, चेतना रामटेककर, सिया इडपाचे, वैशाली राऊत, दामिनी मरस्कोल्हे, रिता मरस्कोल्हे , प्रेरणा ओ.नागपुरे, शुभम अहाके नी भाग घेतला. काव्य सादर करणाऱ्यांमध्ये इंद्रकला बोपचे, उमा गजभिये, भारती कावळे, शताली शेडमाके, किरण वासनिक, कविता राजाभोज, शालू कृपाले, यशोधरा सोनेवाणे, सविता बेदरकर, शुभम अहाके कार्यक्रमाचे संचालन कावळे मैडम ने केले तर उपस्थितांचे आभार शालू कृपाले यांनी मानले. याप्रसंगी वसंत गवळी, निलकंठ चिचाम , ओमप्रकाश नागपुरे , रोमेंद्र बोरकर, अतुल सतदेवे आदी उपस्थीत होते....
No comments: