Breaking

के टी एस मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

गोंदिया । महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक प्रमाणे के टी एस परिचर्या स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी डी जयस्वाल डॉ अनिल आटे वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते

   या वेळी  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली 

संविधान  प्रस्ताविकेचे वाचन डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या नेतृत्वात  करण्यात आले या वेळी संविधान विषयावर क्विझ आयोजित करण्यात आली होती विजयी मुलींना डॉ सुवर्णा हुबेकर यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले 

या वेळी संविधान दिन बाबत मार्गदर्शन करताना डॉ सुवर्ण हुबेकर म्हणाल्या की

प्रजासत्ताक शासनयंत्रणा, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट्य भारतीय संविधानाने आपल्याला दिले आहे. संविधानात लोकशाही, समता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांना अग्रक्रम आहे. या मूल्यांशी सुसंगत असे संस्थात्मक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणत समाजाच्या सर्वंकष उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा आज संविधान दिनानिमित्त निश्चय करूया. या प्रसंगी  त्यानी सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Powered by Blogger.