Breaking

मुंडीपार येथे सार्वजनिक तुलसी विवाह उत्साहात साजरी

गोरेगांव - तालुक्याअन्तर्गत् येणाऱ्या मुंडीपार येथे दरवर्षी यावर्षी सुध्दा पंचागानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळसी विवाहाचे आयोजन  दि.२४/११/२०२३ ला  सार्वजनिक तुळसी विवाह श्री भाऊलालजी डहाके यांच्या भव्य आवारात साजरी  करण्यात आली.

हिंदू रितिरिवाजाप्रमाणे सनातन धर्मात तुळसी विवाहाला विशेष असे महत्व आहे.तुळसीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते.ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, त्या घरातील नकारात्मकता दूर होते,आणि त्या घरात आनंद राहतो.

भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपात  करून  तुळसीचा विवाह सोहळा लावण्यात आला. या तुळसी विवाहाच्या कार्यक्रमामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थीत होते.  सार्वजनिक तुळसी विवाहाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवा राऊत,सोमेश डहाके, विशाल राऊत, ज्ञानेश चौधरी, नितेश सिंधीमेश्राम तसेच अन्य सदस्याच्या अथक परिश्रमातून हे कार्यक्रम उत्साहात पार पडला.

No comments:

Powered by Blogger.