Breaking

नागरा येथे शहीत गोवारी स्मृतिदिन साजरा ११४ गोवारी शहीदांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण

गोंदिया:- तातुक्यातील ग्राम नागरा(कटंगी) येथे आदिवासी गोवारी समाजबांधवांच्या वतीने शहिद गोवारी स्मृतिदिन साजरा करुन ११४ शहीद  गोवारी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. गावातील शिवमंदिर चौक परिसरात स्थित असलेल्या गोवारी शहीद स्मारक येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम ११४ शहीद गोवारी बांधवांच्या स्मरणार्थ शहीद  स्मारकावर दिपप्रज्वलन व पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. 

२३ नोव्हेंबर १९९४ साली गोवारी समाजाला अनुसुचीत जमाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावा या उद्देश्याने आंदोलन करण्यात आले  पण पोलीसांच्या अमानुष लाठीचार्ज मुळे ११४ गोवारी बांधव शहीद झाले.आज २९ वर्षांनंतर सुद्धा गोवारी समाजाला न्याय मिळाला नाही.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते, मा.आदिवासी गोवारी संघटक समन्वयक शालिक नेवारे यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. 

प्रमुख अतिथी मा. सरपंच धनलाल नागपुरे,मा.उपसरपंच नरेश नागरिकर,लमुन्ते गुरुजी,

डी.टी.चौधरी,राधेश्याम कोहळे,

ज्ञानेश्वर राऊत,मोहन शहारे,

विवेक राऊत,शिवलाल नेवारे,

श्याम शेंद्रे,अंकीत शेंद्रे, 

ग्रा.पं सदस्य निर्मला राऊत,

शांता राऊत,मुन्नालाल नागपुरे,

घनश्याम लिल्हारे,नंदणी लिल्हारे,

रमेश लिल्हारे,सुरेश लिल्हारे,

राजेश नागरिकर,मुकेश लिल्हारे,

 राखी बान्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आदिवासी गोवारी समिती नागराचे अध्यक्ष गोपाल भोयर,उपाध्यक्ष रमेश नेवारे,सचिव रविन्द्र राऊत,कोषाध्यक्ष शिवप्रसाद शेंद्रे, सहसचिव लिसराम नेवारे व गावातील गोवारी समाजबांधव-

भगिनी,युवा कार्यकर्ते व सदस्यगण यांनी सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाला गोंदिया , आंभोरा,

अर्जुनी, सावरी,पांढराबोळी,

रायपुर,डोंगरगांव,देवरी,

रावणवाडी, बरबसपुरा,टेमणी येथील  आदीवासी गोवारी समाजाचे सदस्यगण मोठ्या संख्येंत उपस्थीत होते.

No comments:

Powered by Blogger.