मुंडीपार येथे "विखूरले मोती संसाराचे" हा नाट्य प्रयोग उत्साहात साजरा
गोरेगांव । तालुक्यांतर्गत येणाऱ्या मुंडीपार येथे सर्वोदय कलाकुंज माता चौक मुंडीपार च्या सौजन्याने "विखूरले मोती संसाराचे" या नाट्य प्रयोगाचे आयोजन दि.०९/१२/२०२३ रोज शनिवारला रात्री ठिक ९:३० वाजता आयोजीत करण्यात आला होता.ही नाट्यकथा तीन भावांच्या जीवनावरील संघर्षमय, भावनात्मक,जिव्हाळ्यांचे व क्षणाक्षणात हसविणारी तीन अंकी नाट्य पुष्प "विखूरले मोती संसारांचे या नाट्य प्रयोग यशस्वी रित्या पार पडला. यामध्ये विशेष असे सांगावयास झाल्यास हा मंडळ मागील ३२ वषापासुन् गावात अविरतपणे मोफत नाट्य प्रयोग सादर करत आहे. आणि या नाट्य प्रयोगामध्ये आपल्या मुंडीपार गावचेच कलावंत नाटकाच्या माध्यमातून आपल्या अंगी असलेले गुण व कौशल्य सादर करीत असतात. त्यातूनच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुनाना वावं मिळत असते. यातूनच या मंडळातुन् मोठ मोठे कलाकार कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.केवल भाऊ बघेले, उपाध्यक्ष मा.श्री डॉ.लक्ष्मनजी भगत जि.प.गोंदिया, उदघाटक मा.श्री.जगदीशजी यरोला ( सभापती कृषी उ.बा.स.गोरेगांव), सहउदघाटक मा.श्री. सशेंद्रजी भगत सद्स्य जि.प.गोंदिया, दिपप्रज्वलक मा.श्री.इंजि.आनंदजी चंद्रिकापुरे( माऊली फाउंडेशन गोंदिया), मा.श्री.पन्नालालजी बोपचे (संस्थापक पी.के.कॉलेज कुऱ्हाडी), मा.सौ.प्रेमलताताई राऊत(सरपंच ग्रा.प.मुंडीपार), रंगमंचपूजक मा.श्री.खुशालजी वैद्य (जिल्हाध्यक्ष शिवभोजन समिती गोंदिया), बी.जी.कटरे सर ( उपसरपंच मुंडीपार),मा.श्री.घनश्यामजी चौधरी (से.नि. कृषी सहाय्यक) .तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गावचे पोलीस पाटील मा.श्री. विलासजी शिंदीमेश्राम, गावचे त.मु.स.अध्यक्ष मा.श्री.शंकरभाऊ बिसेन.तसेच मान्यवर,गावचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमाच्या वेळी उपश्तीत होते. या कार्यक्रमामधे पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम गावाचे नवनिर्वाचित सरपंच सौ.प्रेमलताताई राऊत , पोलीस पाटील मा.श्री विलासजी सिंधीमेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष मा.श्री शंकरभाऊ बिसेन यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नात्यप्रयोगाचे आयोजन मा.श्री.धर्मेंद्रजी मानापुरे, मा.श्री.हेतरामजी राहांगडाले, शिवाभाऊ राऊत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मा.श्री.धर्मेंद्रजी मानापुरे, भास्कर शेन्डे, संदीप (बंटी श्रीभद्रे,राकेश राऊत, मुन्नाभाऊ राऊत, समीर श्रीभद्रे,आशीश जी शेन्डे, अजय हनवत,यांच्या अथक प्रयत्नातून, व परिश्रमातून हा नाट्य प्रयोगाचा प्रयोग यशश्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. पोरसजी शेंडे यांनी केले तर आभार मा.श्री. धर्मेंद्रजी यांनी मानले.
No comments: