आतापर्यंत 121 नमुने निगेटिव्ह.... 2 नमुन्याचा अहवाल अप्राप्त
गोंदिया । जिल्ह्यात विदेश प्रवास करुन 251 व्यक्ती आल्यात. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा 14 दिवसाचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वतःहून अलगीकरणातच राहावे. जिल्हा प्रशासनाची त्यांच्यावर देखरेख राहणार असून आरोग्य विभाग सुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.
जिल्ह्यातील एकूण 124 नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी 122 नमुन्यांचा चाचणी अहवाल आज 12 एप्रिल रोजी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 121 नमुने निगेटिव्ह आलेले आहे. 1 नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जो एकमेव युवक 26 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता, त्याचा शेवटचा अहवाल 10 एप्रिलला निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 2 नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यातील 2 शासकीय अलगीकरण केंद्रात 61 व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज -51 आणि लहीटोला-10 अशा एकूण 61 व्यक्तींचा समावेश आहे. 1 व्यक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक ,गोंदिया यांनी दिली.
No comments: