Breaking

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मिताने मुरबाड नगरपंचायत हद्दीत गरजुनां ६०० किलो भाजीपाला वाटप !

दि.१५ एप्रिल २०२० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मिताने मुरबाड नगरपंचायत हद्दीत गरजुनां आद.राहुलजी गांधी विचारमंचचे अध्यक्ष इंजि. चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात भाजीपाला वाटप करण्यात आला यावेळी शेतकरी आघाडीचे शिवाजी पवार व गणेश हर्णे, पांडुरंग पवार सर, विचारमंचचे तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, रमेश पवार, तहसिल कर्मचारी लक्ष्मण शिंदे व संतोष पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुरबाड नगरपंचायत हद्दीतील खरब्याचीवाडी, लांबाचीवाडी तसेच नढईवाडी मधील सर्व कुटुबांला भाजीपाला पॅकेटसचे वाटप करण्यात आले. सदरच्या पॅकेटसमध्ये भेंडी, कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी, डांगर आणि प्रत्येकी एक दुधी असे ४-५ दिवस पुरेल इतका भाजीपाला वाटप विचारमंचच्यावतीने करण्यात आले. आद.राहुलजी गांधी विचारमंच हे शिक्षित पुरोगामी वैचारिक तरुण-तरुणींचे संगठन आहे व त्यामाध्यमातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने काहीतरी समाजउपयोगी उपक्रम करावा आणि सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुरबाड तालुक्यातील बिगारी कामगार तसेच आदिवासी मजुर असलेल्या या परिसरामध्ये प्रशासन व पत्रकारांकडुन माहीती घेत गरजु असलेल्या बांधवाना जवळपास ६०० किलो भाजीपाला वाटप करण्यात आल्याचे यावेळी विचारमंचचे अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी माहीती दिली.

No comments:

Powered by Blogger.