मुंडीपार येथील नवनीत बौद्ध उपासक मंडळाच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला
गोरेगांव:-14 ऑक्टोंबर 1956 रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याच्या घटनेस आज ६७ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राम मुंडीपार येथील आंबेडकर चौकात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बुद्ध वंदना व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच 22 प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले.
प्रचार व प्रसार हे प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्यच, व्यक्तींचे व्यक्तींशी व समाजाची नाते कसे असावे, हे धम्म शिकविते. धम्म हे प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण देते. पंचशील हा धम्माच्या गाभा असून मानवी कल्याणासाठी असल्याचे जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत याप्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलले.
कार्यक्रम उद्घाटन जि.पं.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते व अध्यक्षस्थानी गोरेगांव तालुका अध्यक्ष संजय बारेवार होते.तसेच गावातील प्रमुख पाहुणे उपस्थितीत होते.
याप्रसंगी पावसाळी खो-खो स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकविलेल्या लोकमान्य टिळक विद्यालयातील विजयी चमुचे सत्कार व संगीतमय भिमगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनीत बौद्ध उपासक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments: