Breaking

मुलीच्या जन्माचे स्वागत करा _डॉ सुवर्णा हुबेकर

गोंदिया । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत  आयुष्यमान भवं

कॅम्पेन अंतर्गत बेटी बचाओ जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला

    या बेटी बचाओ जनजागृती अभियानचे उद्घाटन माजी सभापती सौ भावना ताई कदम यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका के टी एस जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर

पी सी पी एन डी टी च्या लीगल अधिकारी ऍड रेखा काणतोडे सपाटे डॉ मीना वट्टी डॉ सुवर्णा उपाध्याय नितु  फुले  नीलम शुक्ला आणिअर्चना वासनिक आहार तज्ञा स्वाती बन्सोड आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या 

    आंतरराष्ट्रीय बालिका  दिन निमित्ताने बेटी बचाओ ची शपथ समुपदेशिका नितु फुले यांनी उपस्थित महिलांना दिली या वेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा हुबेकर यांनी सांगितलं की दिवसेंदिवस 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण व लैंगिक गुणोत्तर कमी होत आहे मुलींची संख्या कमी होणे समाजासाठी घातक आहे

म्हणून मुलीच्या जन्माचे स्वागत करा !! आता तर महाराष्ट्र सरकार ने गरीबाच्या लेकीला जन्मतः च लखपती केले आहे!  

 डॉ  सुवर्णा हुबेकर म्हणाल्या राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे,

या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

याचा लाभ घेतला पाहिजे

    या वेळी माजी सभापती भावना ताई कदम यांनी सांगितले की आमच्या आधार महिला संघटना च्या सर्व सखी वर्षभर बेटी बचाओ चे  जनजागरण करणार आहोत

    अडवोकॅटे रेखा सपाटे यांनी सुध्दा बेटी बचाओ अभियान बाबत सविस्तर माहिती दिली तसेच पीसीपीएनडीटी ऍक्ट बाबत सविस्तर माहिती दिली

   आयुष्य मान भवं कॅम्पेन मधून बेटी बचाओ चा जागर 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येक आरोग्य मेळाव्यातून चालत राहणार अशी माहिती डॉक्टर सुवर्णा हुबेकर यांनी दिली

  या कार्यक्रमासाठी सिविल लाईन्स एरेयातील सर्व आशा स्वयंसेवीका आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

No comments:

Powered by Blogger.