Breaking

ग्राम मुंडीपार येथे नवनीत बौद्ध उपासक मंडळाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिवस सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

 

गोरेगांव:-गोरेगांव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील नवनीत बौद्ध उपासक मंडळाच्या वतीने आंबेडकर चौक पाणीटंकीजवळ दिनांक १४ आक्टोंबर 2023 ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिवस सोहळा निम्मित्त लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पावसाळी खो-खो मध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल विजयी चमुचे सत्कार समारोह तसेच रात्री ठीक ८.०० वाजता आंबेडकर चौक पाणीटंकीजवळ भव्य संगीतमय भिमगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रम गोरेगांव तालुका अध्यक्ष भाजपा संजुभाऊ बारेवार यांच्या अध्यक्षतेखाली, उद्घाटक जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत व दिपप्रज्वलन पं.स.सदस्य सौ.शितलताई बिसेन  यांच्या हस्ते पार पाडण्यात येणार आहे. 

तरिपण परिसरातील जनतेला आग्रहाची विनंती सदर कार्यक्रमाला उपस्थित राहुन लाभ घ्यावा.

No comments:

Powered by Blogger.