बायको सरपंच, नवऱ्याची गावात दबंगाई सांगतो नल कनेक्शन धारकाला पाणी येत नसेल तर कनेक्शन कापा...आम्ही तुमच्या बापाचे नोकर नाही..!
गोोंदिया । तिरोडा तालुक्यातील बोदा या गावात वार्ड नंबर 1 येथील लोकांना एक वर्षा पासून पिण्याचे पाणी बराबर भेटत नाही. मात्र वार्ड नंबर 3 मध्ये सरपंचाचे घर आहे. त्या वार्डला सकाळ-संध्याकाळ दोन्ही टाईम नळाचे पाणी भेटते.पण वार्ड नंबर 1 येथे एकदासुद्धा बरोबर पाणी भेटत नाही. ग्रामपंचायतील प्रशासन गाढ झोपेत आहे. वार्ड नंबर 1 येथील काही लोकांनी महिन्याभराच्या अगोदर सुद्धा बातमी प्रकाशित केली होती या गोष्टीला एक महिना होता आला आहेत. पण येथील ग्रामपंचायतीने आज पर्यंत कोणतीही वार्ड नंबर 1 येथील पाण्याची सुविधा केले नाही. शासनाकडून 5- 6 वर्षापूर्वी 50 लाख रुपये खर्च करून गावात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. मात्र सध्याच्या ग्रामपंचायत यातील पदाधिकाऱ्यांनी त्याची जोपासना केली नाही, म्हणून पाणीपुरवठा योजनेचे तीन-तेरा वाजले आणि वार्ड नंबर एक यातील लोक पाण्यापासून वंचित राहिले. या कोरोना काळात लोकांना पाण्याकरिता गावाच्या बाहेरून पिण्याच्या पाणी आणावा लागत आहे.
No comments: