Breaking

संगणकीकरण (ऑनलाईन) सातबारा न झालेल्या 7 गावांचा धान खरेदीचा मार्ग मोकळा

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश, शासन आदेश निर्गमित

गोंदिया । गोंदियाचे जनतेचे आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार विनोद अग्रवाल यांनी परत एकदा ते जनतेचेच आमदार असल्याचे सिद्ध केले आहे. गोंदिया लगतच्या 7 गावांमधील शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन न झाल्यामुळे शेतकरी बांधवांनी रबी धानाची विक्री कुठे करायची असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उद्भवला होता. शासनाने धान खरेदी न केल्यास तुटपुंज्या भावात धानाची विक्री करावी लागणार कि काय यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला होता. या संदर्भात शेतकरी बांधवांनी आमदार विनोद अग्रवाल यांची भेट घेऊन धान विक्रीचा तिढा सोडवण्याची विनंती केली होती. शासन निर्णयाप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन पोर्टल वर नोंदवल्या गेला नव्हता त्यांचे धान खरेदी करण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया ते मुंबई असा पाठपुरावा करत मुंबई येथे सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग श्री. विलास पाटील तसेच सह सचिव अन्न व नागरी पुरवठा यांची भेट घेत 7 गावांमधील शेतकरी बांधवांचा सात बारा ऑनलाईन न झालेल्या शेतकरी बांधवांची धान खरेदी करण्याबाबत विनंती केली होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून संगणकीकरण (ऑनलाईन) सातबारा न झालेल्या 7 गावांचा धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पूर्वी देखील आणली होती मुंबई वरुण परवानगी

मागील खरीप हंगामात देखील शहरालगतच्या सात गावांचा सातबारा ऑनलाईन न झाल्यामुळे धान खरेदी होणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र आमदार विनोद अग्रवाल यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत ऑनलाईन न झालेल्या शेतकरी बांधवांच्या धानाची उचल व्हावी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करत धान खरेदी करणे बाबत आदेश शासनाकडून मंजूर करवून घेतला होता.

सात गावांमधील धान खरेदीची समस्या या पुढे उद्भवणार नाही : आमदार विनोद अग्रवाल

मागील खरीप हंगामात देखील सात गावांमधील शेतकरी बांधवांच्या धान खरेदीचा प्रश्न उद्भवला होता. आणि यंदाच्या रबी हंगामात सुद्धा तोच प्रश्न परत आल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी विषयाच्या तळात जाऊन असे परत परत घडू नये म्हणून सगळे सातबारे  ऑनलाइन करवून घेतले आहे ज्यामुळे सात गावांमधील धान खरेदीची समस्या या पुढे उद्भवणार नाही असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Powered by Blogger.