Breaking

गोंदियात वादग्रस्त राहिलेले जिल्हाधिकारी मीना यांची बदली

गोंदिया । गोंदिया येथील जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर अनेक प्रकरणात वादग्रस्त राहिलेेले जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची बदली सचिव बहुजन समाज व इतर मागासवर्गीय विभाग मंत्रालय मुंबई येथे उपसचिव पदावर झालेली आहे.मीना यांच्याविरोधात बंगला विस्तारीकरणात झाडे तोडल्याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे होतीच.त्यातच तत्कालीन पालकमंत्र्याच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीला पत्रकारांना येण्यास मज्जाव घालून प्रवेशद्वारावरच रोखले होते.यासोबतच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी सुध्दा व्यवहाराने कंटाळलेले होते.त्यांच्या बदली आदेशाने अधिकारी व कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.

No comments:

Powered by Blogger.