अखिल भारतीय बापू युवा संगठन विद्यार्थी समितीचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे
तिरोडा । विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा निर्णय चांगला आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय बापू युवा संगठन के केंद्रीय अध्यक्ष एड योगेश अग्रवाल बापू यांचा मार्गदर्शन खाली अखिल भारतीय बापू युवा संगठन विद्यार्थी समितीचे ग्राम अत्री चे अध्यक्ष नितेश आगासे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ११ मे २०२१ ला तिरोडा तहसिलदार प्रशांत घोरूडे यांच्या मार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले या विषया वर त्वरीत निर्णय घ्यावा, असे समितीने निवेदन केले आहे.
कोरोनामुळे १० व १२ व्या वर्गाची सत्र २०२०-२०२१ ची परीक्षा शाशनाने रद्द केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बिकट असते. आणि साध्या परिस्थिति मधे लोकानां रोजगार नसल्यामुड़े त्याच्याकडे आर्थिक परिस्तिथी ग्रामीण भागात चांगली नाही आहे त्यामुळे त्यांचे पैसे परत मिळणे गरजेचे आहे. आमच्या मागणीचा सरकार सकारात्मकतेने विचार करेल, अशी आशा संगठनला आहे.
निवेदन देतेवेड़ी कार्यकर्ता संदीप यरने, मोणू शेंडे, अतुल शेंडे, हितेश गावंडे, मारोती कावळे,व सर्व समिती चे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments: