मिशन इंद्रधनुष्य यशस्वी करा -डॉ सुवर्णा हुबेकर
गोंदिया। राष्ट्रीय माता बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रम अंतर्गत
केंद्रीय आरोग्य विभागातर्फे मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहीम गोंदिया जिल्ह्यात 7 ऑगस्ट पासून राबविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने माता बैठकी चे आयोजन स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर
प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका भावना ताई कदम तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या अधिपरिचरिका नीलम शुक्ला लसीकरण विभागाच्या अधिपरिचरिका
अर्चना वासनिक पीएचएन निलू चुटे शालिनी कोरेट्टी
प्रियांका डोंगरे व रुपाली टोने आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या
या वेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की बाल मृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी शस्त्र आहे .परंतु नुकत्याच झालेल्या सर्वेक्षण मधून असे दिसून आले की 0 ते 5 वयोगटातील अनेक बालके नियमित लसीकरणापासून वंचित आहेत अर्धवट लसीकरण झालेले बालके वारंवार आजारी पडतात त्यामुळे देखील बाळ मृत्यु दर वाढतो
म्हणून मिशन इंद्रधनुष्य 5.0 मध्ये अश्या अर्धवट लसीकरण झालेल्या व लसीकरण सुटलेल्या बालक यांची नोंद घेऊन त्यांचे प्राधान्य क्रमाने लसीकरण पूर्ण केले जाणार आहे
17 जुलै पासून अंगणवाडी सेविका व आशा वर्कर घरोघरी जाऊन अश्या लसीकरण सुटलेल्या बालकांचे सर्वेक्षण करणार आहेत तरी माता पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी या माता बैठकीत केले.
माजी नगरसेविका भावना ताई कदम यांनी महिलांना आवाहन केले की लसीकरण म्हणजे बाळाची कवच कुंडले आहेत तेंव्हा मिशन इंद्रधनुष्य मध्ये आपल्या बाळाला मोफत लस टोचून संरक्षित करून घ्या. मिशन इंद्रधनुष्य
यशस्वी करा.
बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात बालकांचे मोफत लसीकरण केले जाते याचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य परिचारिका निलू चुटे यांनी आवाहन केले
या कार्यक्रमाचे संचालन स्टाफ रामटेके यांनी केले व आभार प्रदर्शन समुपदेशिका नितु फुले यांनी व्यक्त केले
कार्यक्रमात बहुसंख्य माता भगिनी उपस्थित होत्या.
No comments: