जननायक बिरसा जयंती निमित्त सिकल सेल कॅम्प
गोंदिया । राष्ट्रीय सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत महान क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गोंदियात अर्बन ओपीडी येथे मोफत सिकल सेल निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सर्व प्रथम या शिबिराच्या संयोजिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर व प्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉ सोनारे यांच्या शुभ हस्ते महान क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला
पुष्पहार घालून आदरांजली अर्पित करण्यात आली
या वेळी कॅम्प संयोजिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या की
भारत देशातील महान क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे, जल जंगल आणि जमीन यांचं संवर्धन केले पाहिजे आरोग्य विभागातर्फे आदिवासी महिला व बालके यांच्या वयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या पाड्या पर्यंत पोहोचले पाहिजेत .
म्हणून महान क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने मोफत सिकल सेल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले
या वेळी सिकल सेल या आनुवंशिक आजाराबाबत डॉ सागर सोनारे यांनी माहिती दिली व प्रत्येक युवक युवतींना सिकल स्टेटस जाणून घेण्याचे आवाहन केले
एच एल एल तर्फे डॉ अविनाश शहारे यांनी मोफत सिकल सेल रक्त तपासणी व सीबीसी टेस्ट करण्यात आली
स्क्रिनिंग मध्ये पोसिटीव्ह आलेल्यांचे एच पी एल सी टेस्ट साठी सेंपल्स घेण्यात आली कॅम्प मध्ये सिकल आजाराबाबत जनजागरण करण्यात आले.
No comments: