दिंव्यांग 05% नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्य पदावर -योगेश लिल्हारे
गोंदिया । शासनामार्फत दिव्यागांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर करण्यासाठी शासन समिती नेमण्यात येते.त्या समितीमध्ये अशासकीय सदस्य सदस्य म्हणून एका दिंव्यांग व्यक्तीची निवड स्थानिक आमदारामार्फत करण्यात येते.स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी दिव्यांग कल्याणकारी संघटना गोंदिया जिल्हा अग्रवाल यांनी दिव्यांग कल्याणकारी संघटना गोंदिया जिल्हा मधुन गोंदिया शहर उपाध्यक्ष योगेश लिल्हारे यांची निवड केली.योगेश लिल्हारे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी व दिव्यांगासाठी लढा देण्यात अग्रेसर असतात.म्हणून योगेश लिल्हारे यांची निवड करण्यात आली असे आमदार विनोद कुमार अग्रवाल यांनी संबंधित प्रतिनिधी ला सांगितले.यावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष दिगंबर बंसोड, उपाध्यक्ष शोभेलाल भोंगाडे, सचिन दिनेश पटले व सर्व सदस्यांकडूनआमदार विनोद कुमार अग्रवाल यांचे अभिनंदन करण्यात आले.वं योगेश लिल्हारे यांनी आमदार विनोद कुमार अग्रवाल यांचे आभार मानले.याप्रसंगी योगेश लिल्हारे यांनी दिव्यांगाच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी आपण जिकरीने काम करु असे आश्वासन दिले.
No comments: