Breaking

गंगाबाई हॉस्पिटलमध्ये डाऊन सिन्ड्रोम जनजागृती

गोंदिया: स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात दिनांक 21 मार्च 24 रोजी जागतिक डाऊन सिन्ड्रोम  डे निमित्ताने जनजागृती कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते 

   या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल रोग तज्ञ डॉ सचिन कुमार उइके  गंगाबाई हॉस्पिटल च्या अधीक्षक डॉ नितीका पोयाम के टी एस चे आर एम ओ डॉ बी डी जयस्वाल वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर जेस्ट बालरोग तज्ञा डॉ  पद्मिनी तुरकर डॉ वर्षा रहांगडाले 

डॉ शेंडे डी इ आई सी चे मॅनेजर श्री पारस लोणारे समुपदेशक अजित सिंग आदि प्रामुख्याने उपस्थित होते 

   21 मार्च 24024 रोजी जागतिक डॉउन सिन्ड्रोम बाबत प्रास्तविक माहिती फिजिओथेरपिस्ट श्रीमती प्रकुर्ती मनोहर यांनी विषद केली  बाल रोग तज्ञ डॉ सचिनकुमार उइके

यांनी उपस्थित माता पालक यांना डाऊन सिन्ड्रोम चे लक्षणे निदान व उपचार या बाबत विस्तृत माहिती सांगितली . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी आवाहन केले की बाई गंगाबाई रुग्णालयात डी इ आई सी केंद्रातून अशा 

डाऊन सिन्ड्रोम ग्रस्त बालकांना मोफत निदान उपचार ची सोय महाराष्ट्र शासन तर्फे करण्यात आली आहे त्याचा लाभ घ्यावा.

    डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की डाऊन सिन्ड्रोम ग्रस्त बालकांना 

सहानुभूती ची नव्हे तर पुनर्वसन व उपचाराची गरज असते आपण त्याबाबत समाजात जनजागृती केली पाहिजे 

   कार्यक्रमाचे संचालन प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी त्रिभुवन लिलहारे यांनी केले आभार प्रदर्शनश्रवण तंत्रज्ञ श्री रोशन यांनी व्यक्त केले.

या वेळी डी आई सी मध्ये डाऊन सिन्ड्रोम बाबत माहितीचे आरोग्य प्रदर्शनी आयोजित केली होती त्याचा माता पालकांनी लाभ घेतला

No comments:

Powered by Blogger.