कोलोस्ट्रम बाळाचे पाहिले लसीकरण _ डॉ सुवर्णा हुबेकर
गोंदिया । उत्तम आणि योग्य स्तनपान पूर्ती साठी घरातील लोकांनी स्तनदा मातांना योग्य ती साथ देणे ही कौटुंबिक जबाबदारी आहे .मातेच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यवरच बाळाचे पोषण अवलंबून असते. बाळंतपणात सुरुवातीचे 3 दिवस येणारे चीक दूध म्हणजे कोलोस्त्रम
हेच बाळाचे पाहिले लसीकरण आहे कारण त्यात
नवजात शिशूला होणाऱ्या गंभीर आजरा पासून वाचविणार्या अँटी बॉडीज असतात. असे प्रतिपादन के टी एस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी स्तन पान सप्ताहात मार्गदर्शन करताना सांगितले.
जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे युनिसेफ च्या सहकार्याने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने वोमेन्स अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग नेटवर्क च्या उदघाटन प्रसंगी
डॉ सुवर्णा हुबेकर प्रमुख अतिथी आयुष्य अधिकारी मीनल वट्टी डॉ सुवर्णरेखा उपाध्याय सिकल सेल संयोजिका सपना खंडाईत
आहार तज्ञ कोमल अवस्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आई चे दूध म्हणजे बाळासाठी अमृतच पण आज ही स्तनपान बद्दल गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजे असे मार्गदर्शन डॉ मीनल वट्टी यांनी केले.अंगावरचे दूध वाढण्यासाठी बाळंतिणीला कोणता आहार दयावा
या बद्दल कोमल अवस्थी यांनी मार्गदर्शन केले
डॉ सुवर्ण रेखा उपाध्याय यांनी कांगारू मदर केयेर बद्दल माहिती दिली
बाळाला सुरुवातीचे 6 महिने निव्वळ स्तनपान दिले पाहिजे असे आवाहन सार्वजनिक परिचारिका रुपाली टोने यांनी केले
कार्यक्रमाला बहुसंख्य स्तनदा माता आणि परमेडिकल स्टाफ उपस्थित होता.
No comments: