Breaking

तरुण युवकाना जाती धर्माचे राजकारण नाही तर विकासाचे राजकारण पाहिजे- अतुल खोब्रागडे

गोंदिया ।  आपल्या कुशल कार्यशैलीने समस्त बहुजन, सर्वहारा कष्टकरी समाजात प्रत्यक्ष जाउन त्यांच्या समस्याना  समजून घेऊन तसेच त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक,  राजकीय मान सन्मान ऊँच करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड, मान्यवर कांशीरामजी , मान्य.दिनाभानाजी यांची जयंती तसेच मान्य.डी. के. खापर्डे यांच्या स्मृती दिनानिमीत्त स्थानीक रेस्ट हाउस येथे संकल्प बैठक संविधान मैत्री संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली.
बैठकित प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थीत परिवर्तन पैनल चे अतुल खोब्रागडे यानी मार्गदर्शन करताना म्हटले.. "आम जनतेच्या समस्या, शैक्षणिक ,आर्थिक, आणि सामाजिक विकासाच्या मुद्दयावर आम्ही सारे युवा तरूण परिवर्तन पैनलच्या माध्यमातून जुन जुलाई महिन्यात येणा-या नागपुर पदविधर (स्नातक) मतदार संघ निवडणुक लढवीत आहोत. शिक्षण हे सर्वांचे अधिकार आहे आणि ते सर्वाना समान स्तरावर मिळाले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बाज़ारीकरणाला रोकण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आज तरुणांकडे रोजगार नाही. शिक्षणाचे व्यापार सुरु आहे. या सर्व प्रश्नांवर व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्हाला युवा वर्गातून आमदार प्रतिनिधी पाठविणे गरजेचे आहे.. आज आम्ही युवक तरुणाना धर्म-जातीची नाही, तर सर्वांगीण विकासाची राजनीती पाहिजे, युवकांचे जर विकास साधले जातील तरच देशाचे विकास शक्य आहे. यासाठी म्हणून धर्म जातीची परंपरा तोडण्यासाठी आम्ही आलो आहोत" अशा आशयाचे विचार त्यानी मांडले.
महामानवांच्या छायाचित्रा समक्ष दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली . तद्नंतर महामानवां द्वारे सामाजिक परिवर्तनच्या लढाईत त्यानी केलेल्या संघर्ष स्मृतीना स्मरण करण्यात आले व त्यानी दिलेल्या विचार- मार्गावर चालण्याचे संकल्प केले गेले.
या प्रसंगी परिवर्तन पैनलचे अतुल खोब्रागडे, संविधान मैत्री संघ संयोजक अतुल सतदेवे, सर्व समाज जयंती समारोह समितीचे संयोजक पुरुषोत्तम मोदी, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळचे वसंता गवली, सैय्यद कमर अली, मनोज गजभिये, शैलेश कुंभरे, माधुरी पाटील, सचिन नांदगाये, डॉ.लोकेश तुरकर, मोहसिन खान, सईंम कुरैशी, आभा मेश्राम, उमेश दमाहे, अरुण बन्नाटे, मीलन चौधरी, लक्ष्मी राऊत, पंचशीला पानतवने, अक्षय कडबे, प्रियंका सतदेवे, सुनिल सहारे इत्यादी प्रामुख्याने उपस्थीत होते.
संकल्प बैठकीचे संचालन अतुल सतदेवे तसेच उपस्थीतांचे  आभार पुरुषोत्तम मोदी यानी मानले.

No comments:

Powered by Blogger.