स्विगीच्या माध्यमातून मिळणार घरपोच किराणा सेवा
गोंदिया दि. 28(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून विविध प्रकारच्या उपाययोजना प्रशासनाकडून प्रभावीपणे करण्यात येत आहे.
नागरिकांची खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना देखील करण्यात येत आहे. किराणा दुकानातून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू ह्या गोंदिया शहरातील व तालुक्यातील नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी *स्विगी घरपोच किराणा सेवा* लवकरच प्रशासन उपलब्ध करून देणार आहे.
स्विगीच्या माध्यमातून घरपोच सेवा गोंदिया तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी किराणा व भाजीपाला सामानाची यादी अंकित किराणा स्टोअर्स
(8788 004217) मजदूर चौक, गोंदिया.इंडियन डेली निड्स
(7667800000) मेन मार्केट, गोंदिया.क्रीष्णा डेली निड्स
(9326880440)रिंग रोड, गोंदिया. गीता किराणा स्टोअर्स
( 8805736636) फुलचुर नाका, गोंदिया. सन्नी कावळे
(9309756030) भाजीपाला व्यापारी व नारायणसिंग चौहाण
( 99238335 68) भाजीपाला व्यापारी यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर टाकावी. यावर ग्राहकाने आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक यादीच्या खाली नमूद करावा.
नागरिकांनी आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. लॉक डाउनच्या काळात घरगुती कामाकरिता घरातून बाहेर न पडता प्रशासनास कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सहकार्य करावे.असे आवाहन गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले आहे.
No comments: