भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांना कोरोनाचा संसर्ग..!
भंडारा, गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी स्वतःला विलगीकरण घेतले आहे. यासाठी कारण हे कनिका कपूरच ठरली आहे. कनिकामुळे आणि त्यानंतरच्या साखळीमुळे अडचणीत आले आहेत. कृपाल तुमाने यांच्यानंतर मेंढे यांनीही विलगीकरण करून घेतले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याविरोधात झालेल्या अविश्वास ठरावावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मेंढे यांची सुनावणी होती. आपण दुष्यंतसिंह यांना भेटल्याचे त्यांनी स्वतःहून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

कोरोनाचा संसर्ग झालेली बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिच्या संपर्कात आलेले भाजप खासदार दुष्यंतसिंह संसदेतही उपस्थित राहिल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कोरोनाची दहशत देशाच्या कायदेमंडळापर्यंत पोहोचली आहे. येथूनच महाराष्ट्रातील एका शिवसेना खासदाराला लागण झाल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी स्वत:ला “होम क्वारंटाईन” केले आहे.
No comments: