हॉटेल्स मालकांनी सूचनांचे पालन करावे - डॉ.कादंबरी बलकवडे

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 23 मार्च रोजी हॉटेल्स मालक व टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑपरेटर्स यांची कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, हॉटेल मालकांनी हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी मास्कची व्यवस्था करावी. रेस्टोरेंट मालकांनी ग्राहकांना घरपोच सेवेतून खाद्यपदार्थ देण्याची व्यवस्था करावी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर यांनी घरूनच ऑनलाइन व्यवहार करावे. होम कवॉरंटाईनमध्ये असलेल्या व्यक्ती जर बाहेर फिरत असेल तर ताबडतोब नियंत्रण कक्षाच्या (07182) 230196 या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला हॉटेल्सचे मालक आणि टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांचे ऑपरेटर उपस्थित होते.
No comments: