Breaking

शेतकऱ्यांसाठी विशेष आवाहन ठराविक कालावधीत रब्बी धानाची विक्री करावी-अरुण बन्नाटे

गोंदिया । शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक सूचना कृपया सर्वांनी या सूचनांचे पालन करावे अन्यथा आपण सरकारी आधारभूत किमतीवर आपले धान रब्बीचे विकू शकणार नाही I माननीय जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांचे दिनांक सात एप्रिल 2021 च्या पत्रानुसार रब्बी हंगाम 2020 डेस 21 मध्ये रब्बीचे धान सरकारी आधारभूत किमतीने सोसायटीमध्ये विकण्यासाठी त्यांच्या सातबाराचे नोंदणी दिनांक 11 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत करावयाचे आहे व धानाची विक्री दिनांक 1 मे 2021 ते 30 जून 2021 या कालावधीत केंद्रावर करावयाची आहे ज्या शेतकऱ्यांचे सातबारा एक एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 यादरम्यान ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाले असेल त्यांनाच सरकारी धान खरेदी केंद्रावर धान विकता येईल ज्यांचे ऑनलाईन 30 एप्रिल 2021 पर्यंत झाले नसल्यास ते सरकारी आधारभूत किमतीवर धान विकू शकणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी आणि म्हणून रब्बीची फसल घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आपापल्यात पटवारी सोबत संपर्क साधून सातबारा घ्यावे व संबंधित सोसायटीमध्ये 30 एप्रिल च्या आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घ्यावे शेतकऱ्यांनी यामागचे मूळ छुपे कारण समजून घ्यावे मागिल पावसाळी हंगामातील सोसायटीने खरेदी केलेला धान अजून पर्यंत भरडाई साठी उचललेला नाही त्यामुळे सरकार द्वारा आपले पूर्ण धान्य खरेदी करण्याचा इरादा नाही आणि म्हणूनच सातबारा नोंदणीसाठी खूप कमी कालावधी दिलेला आहे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा इरादा आहे त्यामुळे जिल्हा पणन अधिकारी सातबारा नोंदणीसाठी एक एप्रिल 2021 ही तारीख देतात व या आशयाचे व या आशयाचे पत्र दिनांक सात एप्रिल 2021 ला काढले जाते कृपया पनन अधिकाऱ्यांनी ध्यानात घेतली पाहिजे.

शेतकऱ्यांनी मात्र सूचनांचे पालन करून ठराविक कालावधीत सातबारा ची नोंदणी करून घ्यावी.असे आवाहन-अरुण बन्नाटे अध्यक्ष- अर्पन बहुद्देशीय सामाजिक संस्था,गोंदिया एवं सोशल मीडिया प्रभारी- अवंतीबाई लोधी महासभा,महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.