गोंदिया व भंडारा जिल्ह्यात रब्बी धान खरेदीचा मार्ग होणार सुकर
ना. छगन भुजबळ यांच्या सुचनेवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव पोहोचले गोंदियात
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची उचल करुन भरडाई करण्यास राईस मिलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी व शुक्रवारी (दि.७) झालेल्या बैठकीत सकारात्मकता दाखविली. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग सुरु सुकर झाला आहे.परिणामी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील धान विक्री करणे सियिस्कर होणार आहे. उल्लेखनिय असे की, खा.प्रफुल्ल पटेल यांनी मंत्री छगन भुजबळ व नवाब मलिक यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने या दोन्ही विभागाने खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. परिणामी लाखो क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. हा धान तसाच पडून राहिल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बराऱ्याच प्रमाणात धान गोदामात पडून असल्याने रब्बी हंगामातील धान खरेदीची अडचण निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेत यावर तोडगा काढण्यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्याचे मंत्री तथा गोंदिया चे पालकमंत्री नवाब मलिक तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याशी चर्चा केली होती. तसेच यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंतीसह मागणी केली होती.या प्रकाराची दखल घेत ना. भुजबळांच्या सुचनेवर पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे काल (ता. ६) भंडारा येथे व आज (ता.७) शुक्रवारी गोंदिया येथे आले होते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाचे अधिकारी आणि राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह चर्चा केली. यावेळी राईस मिलर्सने सकारात्मकता दाखविल्याने आता धानाच्या भरडाईचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याच प्रमाणे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील यंत्रणेला पर्यायी खाजगी गोदामाची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली. या बैठकीत आ. मनाेहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची त्वरित उचल करुन रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरु करण्याची मागणी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी सुध्दा धान खरेदी त्वरित सुरु करण्याचे आश्वासन दिले. धान खरेदी आणि भरडाईच्या प्रश्नावर खा. प्रफुल्ल पटेल यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यापूर्वी त्यांनी याच विषयावर मुंबई येथे बैठक घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी गोंदिया व भंडारा येथे पोहचले होते. त्यांनी सुध्दा धान खरेदीवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. गोंडीयाच्या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुधीर श्रृंगार, पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक अतुल नेरकर, आदिवासी विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खासगी गोदाम भाड्याने घ्या
खरीप हंगामात खरेदी केलेला सुमारे ४४ लाख क्विंटल धान तसाच गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळे रब्बीची धान खरेदी करण्याची अडचण जात आहे. त्यामुळे या धानाची साठवणूक करण्यासाठी खासगी गोदाम भाड्याने घेवून उचल करण्यात यावी अशी मागणी आ. मनाेहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव पाटील यांच्याकडे केली.
No comments: