Breaking

केंद्र सरकारने खत कंपन्यांची नफेखोरी आणि भ्रष्टाचार थांबवावा तरच या अनुदानाचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना होईल! - रंगा राचुरे,आप

गोंदिया । काल केंद्र सरकारने खतांवरील सबसिडी वाढवत खत किमती पूर्वपातळीवर ठेवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जैसे थे पण यावर्षी कंपन्यांचा नफा भरघोस वाढणार हे निश्चित! 

महिन्यापूर्वी दर वाढणार नाहीत असे सांगणाऱ्या कम्पनी ने एक महिन्यात खतांचे दर ५५% ने वाढवले .याच इफको भारतातील सर्वात मोठ्या खत कम्पनीचा नफा मागील वर्षी २० टक्के वाढून ८४१ कोटी वरून १००५ झाला. त्यातून कम्पनी ने विमा,जंगल शेती,किरकोळ विक्री,वित्तीय सेवा,एसइझेड, खाद्य प्रक्रिया आदी क्षेत्रात विस्तार मोहीम राबवली आहे. 

आता या कँपन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खताच्या घटक रसायनांचे दर वाढल्याचे कारण सांगत भाववाढ केली.  खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती व फॉस्फेट आणि पोटॅशच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीही वाढल्या आहेत ,त्यांच्या किमतीवर सरकार अनुदान / सबसिडी देते. 

परंतु सरकारने या वाढीव किमतीच्या नावे होणारी कृत्रिम भाववाढ तपासून त्यातील नफेखोरी नियंत्रित करायला हवी होती आयात मालाच्या किंमती वाढवून हा कच्चा माल भारतात आणला जातो व मनी लाँडरिंग केले जाते असे आरोप बरेच दिवस होत आहेत. याच कारणास्तव आजच इफको चे मुख्य संचालक यु एस अवस्थी यांच्या १२कार्यालयावर, घरावर देशभर धाडी घातल्या गेल्या आहेत. इंडियन पोट्याश लिमिटेड व इफको मध्ये असे गैरवापर केल्याचे सीबीआय ने म्हंटले आहे 

हे सर्व पाहता भ्रष्टाचार व नफेखोरी रोखली तर खत किमती पूर्वीपेक्षा कमी होऊन शेतकऱ्याला सबसिडीचा अधिक फायदा होईल असे आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी म्हंटले आहे.


No comments:

Powered by Blogger.