Breaking

न्यूमोनिया प्रतिबंधक PCV लसीकरण Inaguration progm

गोंदिया । राष्ट्रीय माताबालसंगोपण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे बुधवार, 14 जुलै रोजी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात मोफत न्युमोकोकल (पीवीसी) लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी न्युमोकोकल लसीकरणाचा लाभ घ्या, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेशचंद्र तिरपुडे होते. लसीकरणाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमरिश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, बालरोग विभाग प्रमुख डॉ.मनीष तिवारी, प्रा.सुनील देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, गंगाबाई महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सागर सोनारे, पीएचएन रूपाली टोणे, निलू चुटे आदि उपस्थित होते.

PVC vaccinationकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मेट्रन माधुरी लाड यांनी मांडले. या वेळी न्यूमोनिया प्रतिबंधक पीव्हीसी लसीबाबत शास्त्रीय माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कापसे यांनी पालकांना सांगितली

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तिरपुडे यांनी आवाहन केले की, शासनाने एवढी महागडी लस शासकीय रुग्णालयातून सामान्य जनतेसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाभ घायवा. गोंदिया जिल्ह्यातील 1 वर्षाच्या आतील पात्र बालकांना न्युमोकोकल लसीकरण करून घेतले तर निश्चितच बालमृत्यू कमी होईल. बालमृत्युचे मुख्य कारण न्यूमोनिया हेच असल्याचे अभ्यासाअंती आढळून आले आहे

त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मोहबे यांच्या हस्ते 6 आठवडे वय असलेल्या एका नवजात शिशुला पीएचएन रूपाली टोणे यांच्या हस्ते न्यूमोनिया प्रतिबंधक लस (पीसीव्ही) टोचण्यात आली. यानंतर उपस्थित इतर 7 बालकांना सुद्धा अधिष्ठाता डॉ.तिरपुडे व बालरोग तज्ञ डॉ.सुनील देशमुख यांनी लसीकरण करून दिले.

न्युमोकोकल लसीचे डोस:

न्युमोकोकल लसीचे 3 डोस अपेक्षित आहेत. पहिला डोस 6 आठवडे, त्यानंतर 14 आठवडे व त्यानंतर बुष्टर डोस 9 महिने अशा पद्धतीने एका वर्षाच्या आतील बालकाला लस देवून संरक्षित करणे आहे. अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी दिली.

सध्या गोंदियात या वयोगतील 1895 लाभार्थी यादीमध्ये नोंद आहेत. त्या सर्वांना मोफत लसीकरण करून दिले जाणार आहे, असे अधीक्षक डॉ.सोनारे यांनी सांगितले.

पहिल्या दिवशी 11 बालकांना न्युमोकोकल लसीकरण करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात सर्व ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी परवेज शेख, ओपीडी इन्चार्ज देशमुख, बालरोग विभागातील पारधी, स्वाती बंसोड, दीपाली पानतावणे, जिजा अहिर, पल्लवी वासनिक आदींनी सहकार्य केले.

No comments:

Powered by Blogger.