आयुष्यमान मेळाव्यात सिकलसेल जनजागृती
गोंदिया । महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे 30 सप्टेंबर रोजी
आयुष्यमान भवं आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता
या मेळाव्यात प्रामुख्याने
एन सी डी व सिकल सेल आणि क्षय रोग प्रतिबंध जनजागृती करण्यात आली
जिल्हा सिकल सेल नियंत्रण कक्षा मार्फत देखील मोफत सिकल आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले होते
या सिकल कॅम्प चे आयोजन के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सिकल समनवयिका
सपना खंडाईत यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते
या वेळी मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की प्रत्येक युवक युवती नि आपले सिकल स्टेटस जाणून घेतले पाहिजे सध्या प्रत्येक शनिवारी आरोग्य मेळावा तुन मोफत सिकल स्क्रिनिंग होत आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे.
या आरोग्य मेळाव्यात सिकल स्क्रिनिंग साठी प्रयोगशाळा अधिकारी श्री लिलहारे व समुपदेशिका श्रीमती नितु फुले, संतोष नायकाने यांनी सिकल सेल स्क्रिनिंग साठी सहकार्य केले.
रुग्ण आणि नातेवाईक यांना
सिकल सेल आजाराबाबत माहिती पत्रके वाटप करण्यात आली .
No comments: