अंगावर चट्टा डॉक्टरला भेटा -डॉ सुवर्णा हुबेकर
गोंदिया । राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत 15 सप्टेंबर ते 31 डिसेंम्बर या कालावधीत दर शनिवारी आरोग्य मेळावा आयोजित केला जात आहे
या आरोग्य मेळाव्यातून मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जात आहेत
या साप्ताहिक मेळाव्यासाठी या वेळी संसर्गजनक रोग या बाबत जनजागृती ही थीम ठरविण्यात आलेली होती
त्या नुसार टी बी क्षयरोग
कुष्ठरोग लेप्रारोग मलेरिया डेंगू आदि विषयी जनजागृती
कॅम्पेन आयोजित करण्यात आली होती
गोंदिया शहरातील अर्बन हेल्थ सेन्टर येथे या साप्ताहिक आरोग्य मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक
म्हणून डॉ सुवर्णा हुबेकर तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ सचिनकुमार उइके उपस्थित होते आणि प्रमुख
अतिथी म्हणुन माजी सभापती भावना कदम व आधार संघटना च्या लता बाजपाई
आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना माजी सभापती भावनाताई कदम यांनी आवाहन केले की महिलांनी वेळोवेळी आपली वैद्यकीय तपासणी करून
घ्यावी कुठलाही ताप अंगावर घेऊ नये आठवद्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा परिसर स्वच्छता ठेवावी
म्हणजे आपण डेंग्यूच्या आजाराला बळी पडणार नाहीत
या साप्ताहिक आरोग्य मेळाव्यात मार्गदर्शन करताना के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या अंगावर कुठला ही चट्टा दिसल्यास डॉक्टर ला भेटा!! कुष्ठरोग लपवू नका
कुष्ठरोग हा कुठल्याही शाप किंवा पाप केल्या मूळे होत नाही तर कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार आहे तो माईकोबाक्टरीया लॅपरी मूळे होतो आज प्रत्येक सरकारी रुग्णालयात कुष्ठरोग वरील इलाज मोफत उपलब्ध आहे
त्याचा लाभ घ्या!! कुष्ठमुक्त गोंदियाचा संकल्प करा!!
विशेष म्हणजे या वेळी कुष्ठरोग बाबत शास्त्रीय माहिती देणारे आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आले होते त्याचा लाभ उपस्थित रुग्णांनी घेतला
आरोग्य मेळावा यशस्वी करण्यासाठी आशा स्वयसेविका व एनजीओ कार्यकर्ते यांनी सहकार्य केले
No comments: