Breaking

युवतींनो सिकल तपासणी करा -- डॉ सुवर्णा हुबेकर

गोंदिया । राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागा तर्फे 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान सिकल सेल जनजागरण सप्ताह आयोजित करण्यात आला. या निमित्ताने स्थानिक के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयात नारी संमेलन आयोजित करण्यात  आले 

होते. संमेलनाचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. नारी संमेलनाला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सपना खंडाईत 

एन सी डी च्या समनवयिका

डॉ स्नेहा वंजारी,  पी सी पी एन डी टी च्या लीगल प्रवक्त्या ऍड सपाटे सार्वजनिक आरोग्य परिचारिका निलू चुटे शालिनी कोरेट्टी रुपाली टोने तसेच  जिल्हा लेखा अधिकारी सौ शिवणकर  आयुष अधिकारी मीनल वट्टी  डॉ सुवर्णा उपाध्याय ,फिजीओथेरपिष्ट कांचन भोयर  प्रयोगशाळा तंत्रज्ञा  तुरकर  तसेच सिकल समुपदेशिका  निशा डहाके 

आणि  निकिता 

शरणागत  आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या

   सिकल जनजागरण सप्ताह बाबत प्रास्ताविक माहिती सपना खंडाईत यांनी विस्तृत पणे नमूद केली

    या वेळी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी

डॉ सुवर्णा हुबेकर म्हणाल्या की सिकल सेल हा एक गंभीर आजार आहे  सिकलसेल आजाराला समूळ उच्चाटन करायचे असेल तर 

प्रत्येक युवतींनी स्वतःचे सिकल स्टेटस तपासून घ्यावे

 पालकांनी लग्न जुळवताना

कुंडली जुळविण्या पेक्षा 

आरोग्य कुंडली तपासून 

लग्न जुळवावें . 

    डॉ स्नेहा वंजारी यांनी आवाहन केले की सध्या सिकल सेल जनजागरण सप्ताह सुरू असल्याने मोफत सिकल सेल रक्त तपासणी करून या संधीचा फायदा घ्यावा.

    या नारी संमेलन मध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनि सिकल सेल बाबत बहुमोल मार्गदर्शन केले  

युवतीची मोफत सिकल रक्त तपासणी करण्यात आली

कॅम्प यशस्वी करण्यासाठी 

केटीएस येथील सिकल सेल 

डेस्क ने  अथक परिश्रम घेतले.

No comments:

Powered by Blogger.