Breaking

सौंदड जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल

सौंदड। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत माहे फरवरी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  विद्यालयाच्या निकाल शंभर टक्के लागलेला असून 100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. या परीक्षेत एकूण 78 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये दोन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीततर 37 विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले. यात प्राची बाळकृष्ण फुंडे हिने 80 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम तर पियुष राधेश्याम डोंगरवार 77.50% गुण घेऊन द्वितीय तसेच मीनाक्षी योगराज तुरकर हिने 72.33% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे दिव्या गोविंदा निर्वाण हिने 71% व तेजस सेवक राम मेश्राम 70.50% व भूमेश्वरी देवराम मेंढे हिने 70.33% गुण घेऊन विद्यालयाचा नावलौकिक केला. सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय प्रशासनातर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Powered by Blogger.