Breaking

जागतिक महिला आरोग्य दिन उत्साहात साजरा

गोंदिया । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत माता बाल संगोपन कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय राजेगाव येथे नुकताच जागतिक महिला आरोग्य दिन दिनांक 28 मे रोजी साजरा करण्यात आला.

    या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या जनरल आरोग्यासाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कॅम्प चे उद्घाटन 

के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या महिला वैद्यकीय अधिकारी डाक्टर सुवर्णा हुबेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले

      या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून राजेगाव

ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी

अधिपरिचरिका सौ इंदिराताई पटले  उपस्थित होत्या 

डे केयेर सेन्टर प्रभारी जयशीला पटले  व औषधी निर्माता अश्विनी सातपुते व प्रशिक्षणार्थी अंतरवासीता

डॉक्टर सोनाली चांगोले

डॉक्टर  प्रगती येलेकर 

डॉ नवनीत बेले डॉ रितीक उन्हाळे व  डॉ ऋषिकेश

बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित  होते 

     के टी एस च्या वैद्यकीय अधिकारी  डॉ सुवर्णा हुबेकर यांनी  जागतिक महिला आरोग्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना सांगितले की बदलत्या जीवनशैली मुळे व रोजच्या धकाधकीच्या  कार्यप्रणाली मुळे महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   त्यामुळे  कामकाजी महिलांना आपल्या आरोग्याप्रति दक्ष राहण्यासाठी प्रेरित करण्यासाठी 28 मे रोजी जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे . ग्रामीण रुग्णालयाच्या 

प्रभारी अधिपरिचरिका सौ इंदिरा पटले यांनी सुद्धा आवाहन केले की महिलांनी अनेमिया व कॅल्शियम कमतरता टाळण्यासाठी 

संतुलित आहार सेवन करावा

आपल्या  निरोगी आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी व 

चाळीशी पार महिलांनी 

कॅन्सर स्क्रिनिंग अवश्य करावे. अंतरवासीता डॉक्टर सोनाली चांगोले यांनी ग्रामीण 

महिलांना निरोगी व सुदृढ राहण्यासाठी  टिप्स दिल्या

डॉक्टर  प्रगती  येलेकर आणि चमू ने महिलांची मोफत सी बी सी रक्त तपासणी व सिकल स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी करून औषधउपचार केले

    जागतिक महिला आरोग्य दिन ग्रामीण रुग्णालयात उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला  त्यासाठी हॉस्पिटल च्या सर्व परमेडीकल स्टाफ ने सहकार्य केले.

No comments:

Powered by Blogger.