सडक अर्जुनी । तालुक्यातील घाटबोरी तेली येथील दोन प्रतिष्ठानांवर (ता.१८) उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या चमूने धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात अन्नसाठा मिळून आला. याप्रकरणी दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
घाटबोरीतेली येथील हिमांशु अनाज भंडार येथे सार्वजनिक वितरण प्रणालीचा अन्नधान्य साठवून ठेवलेला सापडला. यामध्ये १५ पॉकिट चणाडाळ, ४० कट्टे तांदूळ रेशन दुकानदारांकडू खरेदी केलेला आढळून आला. तर दुसरी कारवाई चोपराम पतिराम आगाशे रा. घाटबोरी/तेली यांच्या घरी करण्यात आली. दरम्यान ४ कट्टे गहू, २५ कट्टे तांदूळ, १ कट्टा चणा आदी जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवल्याचे सापडले. ही कारवाई तहसीलदार उषा चौधरी यांच्या मार्गदर्शनात सौंदडचे मंडळ अधिकारी कृपानंद बी. गजभिये व परसोडाचे तलाठी किशोर सांगोडे आदींनी पार पाडली.
संचारबंदीच्या काळात कोणत्याही दुकानदाराने अन्नधान्य साठवून ठेऊ नये, तसेच रास्त दरानेच जीवनावश्यक वस्तू विक्री करावे, असे स्पष्ट आदेश शासनाचे आहेत. असे असतांनाही काही दुकानदार लूट करण्याच्या दृष्टीकोणातून काळाबाजारी करीत आहेत. त्यामुळेच कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही विक्रेत्याने शासनाच्या निर्देशानुसारच व्यापार करावे.
-प्रशांत ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी
घाटबोरी/तेली येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपास करून शासनामार्फत राशन कार्ड वर लाभार्थ्यांना मिळणारे राशन विकणार्या व घेणार्या संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल
उषा चौधरी, तहसीलदार
No comments: